आता मेस्सी विरुद्ध मुसा 

वृत्तसंस्था
Sunday, 24 June 2018

आइसलॅंडचा पराभव करून अर्जेंटिनाला जीवदान देणारा नायजेरियाचा अहमद मुसा अर्जेंटिनासाठी सोशल मीडियावर "मेस्सी' ठरत आहे; पण याच मेस्सीविरुद्ध खराखुरा मेस्सी कशी कामगिरी करतो यावर अर्जेंटिनाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. हा सामना मंगळवारी (ता. 26) होणार आहे. 

व्होल्गोग्राड - आइसलॅंडचा पराभव करून अर्जेंटिनाला जीवदान देणारा नायजेरियाचा अहमद मुसा अर्जेंटिनासाठी सोशल मीडियावर "मेस्सी' ठरत आहे; पण याच मेस्सीविरुद्ध खराखुरा मेस्सी कशी कामगिरी करतो यावर अर्जेंटिनाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. हा सामना मंगळवारी (ता. 26) होणार आहे. 

मी अर्जेंटिनाविरुद्ध आणि मेस्सीविरुद्ध जेव्हा जेव्हा खेळलो आहे, तेव्हा तेव्हा मी गोल केला आहे, असे सांगून मुसाने जणू काही अर्जेंटिनाला इशाराच दिला आहे. चार वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये झालेल्या स्पर्धेत मी मेस्सीविरुद्ध दोन गोल केले होते. त्या सामन्यात अर्जेंटिनाने 3-2 असा विजय मिळवला होता आणि मेस्सीनेही दोन गोल केले होते. 

सलग दोन स्पर्धेत गोल करणारा मुसा नायजेरियाचा पहिला खेळाडू ठरला आहे. नायजेरियाकडून सर्वाधिक गोल करणारा मी पहिला खेळाडू ठरलो आहे, याचा आनंद आहे. हे सोपे नाही; मात्र प्रशिक्षकांचे सहकार्य आणि त्यांचा विश्‍वास महत्त्वाचा ठरला, असे मुसाने सांगितले. 

"ड' गटातून क्रोएशिया उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे पात्र ठरणाऱ्या दुसऱ्या संघासाठी नायजेरिया, अर्जेंटिना आणि आइसलॅंड यांच्यामध्ये चुरस आहे. आता अखेरचा साखळी सामना "करो या मरो' असा आहे. हा सामना आम्हाला जिंकायचाच आहे. 90 मिनिटांच्या खेळात आम्हाला सर्वोत्तम खेळ करायचा आहे, असे मुसा म्हणतो. अर्जेंटिनाला हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. त्यामुळे मेस्सी विरुद्ध मुसा या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Messi against musa