पवार्डचा अर्जेंटिनाविरुद्धचा गोल विश्‍वकरंडकातील सर्वोत्तम 

वृत्तसंस्था
Friday, 27 July 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या फ्रान्सच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला. फ्रान्सच्या बेंजामिन पवार्ड याने अर्जेंटिनाविरुद्ध केलेला गोल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ठरला आहे. 

झ्युरिच - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या फ्रान्सच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला. फ्रान्सच्या बेंजामिन पवार्ड याने अर्जेंटिनाविरुद्ध केलेला गोल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ठरला आहे. 

डाव्या बाजूने मुसंडी मारलेल्या 22 वर्षीय पवार्डने लुकास हर्नाडेझकडून मिळालेल्या क्रॉस पासवर उजव्या पायाने मारलेली व्हॉली हवेत स्पिन होत गोलपोस्टच्या वरच्या कोपऱ्यातून जाळीत गेली. या गोलने फ्रान्सने अर्जेंटिनाविरुद्ध बरोबरी साधली होती.

स्पर्धेत नोंद झालेल्या 169 गोलमधून चाहत्यांची सर्वाधिक मते पवार्डने केलेल्या गोलला मिळाली. त्यानंतर कोलंबियाचा ज्युआन क्विंटेरोने जपानविरुद्ध फ्री-किकवर केलेला आणि क्रोएशियाच्या लुका मॉड्रिचने अर्जेंटिनाविरुद्ध केलेल्या गोलला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pavards goal against Argentina voted best of World Cup