पेनल्टी आणि "वार' यंदा सर्वाधिक पेनल्टी कीकचा विक्रम होणार

वृत्तसंस्था
Sunday, 24 June 2018

रशियातील 21 वी विश्‍वकरंडक स्पर्धा पेनल्टी आणि व्हिडिओ असिस्टन्ट रेफ्री (वार) यावरून चांगलीच गाजत आहे. आतापर्यंतच्या 27 सामन्यांत 13 पेनल्टी कीक देण्यात आल्या. एकाच स्पर्धेत सर्वाधिक 18 पेनल्टीचा विक्रम असून, यंदा हा विक्रम लवकरच मोडला जाण्याची शक्‍यता आहे. शनिवारी ट्युनिशियाविरुद्धच्या सामन्यात बेल्जियमला पेनल्टी कीक देण्यात आली. 

समारा - रशियातील 21 वी विश्‍वकरंडक स्पर्धा पेनल्टी आणि व्हिडिओ असिस्टन्ट रेफ्री (वार) यावरून चांगलीच गाजत आहे. आतापर्यंतच्या 27 सामन्यांत 13 पेनल्टी कीक देण्यात आल्या. एकाच स्पर्धेत सर्वाधिक 18 पेनल्टीचा विक्रम असून, यंदा हा विक्रम लवकरच मोडला जाण्याची शक्‍यता आहे. शनिवारी ट्युनिशियाविरुद्धच्या सामन्यात बेल्जियमला पेनल्टी कीक देण्यात आली. 

चार वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये झालेल्या संपूर्ण स्पर्धेत केवळ 13 पेनल्टी देण्यात आल्या होत्या. तर, 2002 मधील स्पर्धेत सर्वाधिक 18 पेनल्टीचा विक्रम आहे. गोलक्षेत्रात होणाऱ्या फाउलचे प्रमाण वाढल्यामुळे पेनल्टी कीकचेही प्रमाण वाढल्याचे सांगण्यात येत आहे. "वार'च्या समावेशामुळे पेनल्टीचीही संख्या वाढत आहे. यंदा आतापर्यंत सहा पेनल्टी व्हिडिओ पाहून देण्यात आलेल्या आहेत. ब्राझील-कोस्टा रिका सामन्यात फाउल झाल्यामुळे नेमार पेनल्टीची मागणी करत होता; परंतु रेफ्रींनी व्हिडिओ पाहून पेनल्टी नाकारली. त्यामुळे "वार'चा योग्य उपयोग होत असल्याचीही चर्चा होत वारचा उपयोग होणार नाही, अशी चर्चा ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर करण्यात येत होती; परंतु त्याचा रेफ्रींना चांगले साह्य होत असल्याचे दिसून येत आहे, असे फिफाच्या रेफ्री मंडळाचे संचालक मासिमो बुकासा यांनी सांगितले. काही जण "वार'वर टीका करत असले, तरी चांगले यश मिळत असल्याचे फिफाचे म्हणणे आहे. 

"वार'वरून वाद 
तंत्रज्ञानाचा उपयोग कोणकोणत्या प्रसंगांसाठी करायचा, यावरून संभ्रम आहे. यंदाच्या स्पर्धेत गोल, पेनल्टी, रेड कार्ड आणि गैरप्रकार यासाठी "वार'च्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. फ्रीकीकसाठीही याचा वापर करावा, असे काही खेळाडूंचे मत आहे. 

"ड' गटातील डेन्मार्कला दोन्ही सामन्यांत पेनल्टी स्वीकारावी लागली. तसेच, काल ऑस्ट्रेलियाच्या युसुफ पौलसेनने पेनल्टी क्षेत्रात हॅंडबॉल केल्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना पेनल्टी देण्यात आली आणि हॅंडबॉल निश्‍चित करण्यासाठी रेफ्रींनी या वेळी तंत्रज्ञानाचा वापर केला. आम्ही या "वार' पद्धतीचा निषेध करत आहोत, असे डेन्मार्कचा मिडफिल्डर ख्रिस्तियन एरिकसेनने सांगितले. आम्हाला सलग दोनदा याचा फटका बसल्यामुळे येथून पुढे आम्ही या पद्धतीचा तिरस्कार करू, असेही तो नाराजीने म्हणाला. तुम्ही पेनल्टीसाठी ही पद्धत वापणार असाल, तर फ्रीकीकसाठी का नाही, असाही प्रश्‍न त्याने उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Penalties and "War" will be the highest penalty hack record in this year