रोनाल्डोसमोर माद्रिद डर्बीचा चक्रव्यूह

वृत्तसंस्था
Saturday, 30 June 2018

विश्‍वकरंडक स्पर्धेत एकही गोल न स्वीकारलेला उरुग्वे आणि स्पर्धेतील सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील लढतीकडे फुटबॉल जगताचे लक्ष आहे. या लढतीच्या निमित्ताने स्पॅनिश लीगच्या माद्रिद डर्बीतील चुरस लढतच निश्‍चित करेल.

रोस्तोव-ना-दॅनू : विश्‍वकरंडक स्पर्धेत एकही गोल न स्वीकारलेला उरुग्वे आणि स्पर्धेतील सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील लढतीकडे फुटबॉल जगताचे लक्ष आहे. या लढतीच्या निमित्ताने स्पॅनिश लीगच्या माद्रिद डर्बीतील चुरस लढतच निश्‍चित करेल.

रेयाल माद्रिदचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या प्रत्येक चालीचा सखोल अभ्यास ऍटलेटिकोच्या दिएगो गॉडीन याने केला आहे. तोच उरुग्वेचा कर्णधार आहे. तो रोनाल्डोची कोंडी करण्यासाठी योजना करणार आहे. या लढतीकडे फुटबॉल तज्ज्ञांचे जास्त लक्ष असेल.

ऍटलेटिको आणि रेयाल यांच्यातील 27 माद्रिद डर्बीत गॉडीन 8-10 असा काहीसाच मागे आहे. रोनाल्डोने ऍटलेटिकोविरुद्ध दोन हॅट्ट्रिक केल्या आहेत; पण गेल्या 20 पैकी 13 लढतीत एकही गोल केलेला नाही. मैदानावरील दोघांतील हा संघर्ष टोकासही जातो. रोनाल्डोने सुपर कप लढतीत गॉडिनला ताकदवान पंच दिला होता. त्याची भरपाई करताना गॉडीनने रोनाल्डोच्या डोक्‍यात कोपर मारले होते. दोघेही लाल कार्डमधून सुटले होते.

गॉडिनची ही तिसरी स्पर्धा. गतस्पर्धेत त्याच्या हेडरमुळेच उरुग्वेने इटलीस 1-0 हरवले आणि बाद फेरी गाठली होती. अर्थात, त्यांना कोलंबियाविरुद्ध लगेच हार पत्करावी लागली; पण गॉडीनचा हा गोल अनेकांच्या लक्षात आहे. उरुग्वेचे मार्गदर्शक ऑस्कर तॅबारेझ यांनी तर त्या गोलचे छायाचित्र दाखवत खेळाडूंना सलामीच्या लढतीच्या वेळी विश्रांतीस प्रेरित केले होते. त्यानंतर जोस गिमेंझने हेडरवर गोल करीत उरुग्वेला इजिप्तविरुद्ध विजय मिळवून दिला.

रेयाल माद्रिदच्या छायेत वावरण्याची वेळ ऍटलेटिकोवर गेल्या काही वर्षांत आली. त्यामुळेच त्यांनी रेयालला जास्त लक्ष्य केले. त्यांच्याविरुद्धच्या लढतीच्या वेळी पूर्ण झोकून देतात. आता त्याच जोरावर रेयालला ऍटलेटिकोवरील वर्चस्वापासून रोखतात. कोणत्याही परिस्थितीत हार नाही, विजयासाठी वाट्टेल ते हा उरुग्वेचा मंत्र. या दोन्हीचा मेळ गॉडिनच्या खेळात दिसतो. त्याची बचावातील कमालीची आक्रमकताच रोनाल्डोचा कस पाहणार हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Portugal vs Uruguay Football world cup