कतारचा दक्षिण कोरियावर विजय 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

दोहा : हसन अल हैदोस याने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर कतारने विश्‍वकरंडक फुटबॉल पात्रता फेरीच्या लढतीत दक्षिण कोरियावर 3-2 असा विजय मिळविला. सामन्याच्या 25व्या मिनिटाला हैदोसने कतारला आघाडीवर नेले होते.

त्यानंतर उत्तरार्धात सुरवातीलाच अफिफने गोल करून ही आघाडी वाढवली. त्यानंतर आठ मिनिटांत दोन गोल करत कोरियाने बरोबरी साधली होती. सुंग युएंग याने 62, तर हवॉंग याने 70व्या मिनिटाला गोल केला. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही.

सामन्याच्या 75व्या मिनिटाला हैदोसने वैयक्तिक दुसरा गोल करून कतारच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अन्य एका सामन्यात सिरीया-चीन 2-2, इराक-जपान 1-1 आणि थायलंड-संयुक्त अरब अमिराती 1-1 हे सामने बरोबरीत सुटले. 

Web Title: Qatar win over South Korea