esakal | क्‍लब विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत रेयाल माद्रिद अंतिम फेरीत
sakal

बोलून बातमी शोधा

football

क्‍लब विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत रेयाल माद्रिद अंतिम फेरीत

sakal_logo
By
पीटीआय

योकोहामा - वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरलेल्या क्रिस्तिआनो रोनाल्डो याच्या कामगिरीच्या जोरावर रेयाल माद्रिदने क्‍लब विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यांनी मेक्‍सिकोतील क्‍लब अमेरिका संघाचा 2-0 असा पराभव केला. विजेतेपदाच्या लढतीत त्यांची गाठ कशिमा अँटलर्स संघाशी रविवारी पडेल. रेयालकडून करिम बेन्झेंमा आणि रोनाल्डो यांनी गोल केले. रोनाल्डोचा हा क्‍लबसाठी केलेला पाचशेवा गोल ठरला.