मालामाल होण्याची चिनी ऑफर रोनाल्डोने नाकारली 

मालामाल होण्याची चिनी ऑफर रोनाल्डोने नाकारली 

माद्रिद : रेयाल माद्रिदचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याने चायनीज सुपर लीगमधील एका क्‍लबची वर्षाला दहा कोटी युरोची भरघोस ऑफर नाकारली आहे. त्याचा एजंट जोर्गे मेंडेस याने ही माहिती दिली. 

रोनाल्डोला दर मोसमाला 104.6 दशलक्ष डॉलरची ऑफर होती. सध्या त्याला मिळत असलेल्या रकमेच्या तुलनेत हा आकडा पाच पटींनी जास्त आहे. यानंतरही रोनाल्डोने तो नाकारला. रोनाल्डो 31 वर्षांचा असून, पोर्तुगालचा कर्णधार आहे. त्याच्यासाठी सरते वर्ष फलदायी ठरले. त्याला एकूण 264 दशलक्ष डॉलरची ऑफर होती. मेंडेस यांनी "स्काय स्पोर्टस'ला सांगितले, की रोनाल्डोला चिनी क्‍लबने अशी ऑफर देण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांची भूमिका समजू शकते, कारण त्यांना जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू हवे आहेत. 

शांघाय शेन्हुआ क्‍लबने अर्जेंटिनाचा स्ट्रायकर कार्लोस तेवेझ याला नुकतेच करारबद्ध केले. त्याला दोन वर्षांसाठी घेण्यात आले. आठवड्याला 720000 युरो (757102 डॉलर) इतकी रक्कम त्याला मिळेल. कराराची एकूण रक्कम 84 दशलक्ष युरो इतकी असल्याचे वृत्त आहे. तेवेझ 32 वर्षांचा आहे. तो जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत फुटबॉलपटू बनला. पॉल पोग्बा, गॅरेथ बेल, रोनाल्डो, गोंझालो हिग्युएन आणि नेमार हे पहिले पाच जण आहेत. 

अलीकडेच चेल्सीकडून खेळणारा ब्राझीलचा मध्यरक्षक ऑस्कर शांघाय स्पीग क्‍लबकडे दाखल झाला. त्याला 71 दशलक्ष युरो रक्कम मिळाल्याचे वृत्त आहे. 

चायनीज सुपर लीगमध्ये दाखल झालेल्या मातब्बर खेळाडूंमध्ये पॉलीन्हो (गॉंगझू एव्हरग्रॅंडे), रिनाटो ऑगुस्टो (बीजिंग गुओअन), डेम्बा बा (शांघाय शेन्हुआ) आणि एझीकील लॅव्हेझ्झी (हेबेई चायना फॉर्च्युन) यांचा समावेश आहे. 

पैसा हे सर्वस्व असत नाही. ख्रिस्तीयानोसाठी स्पॅनिश क्‍लब अर्थात रेयाल हेच जीवन आहे. तो माद्रिदमध्ये आनंदी आहे. त्याला स्पेनमध्येच फुटबॉल खेळत राहायचे आहे. त्याला मिळविणे चिनी क्‍लबसाठी अशक्‍य आहे. 
- जोर्गे मेंडेस, ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा एजंट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com