बिल्डिंग सफाई करणारे ठरणार रोनाल्डोची डोकेदुखी 

वृत्तसंस्था
Wednesday, 20 June 2018

फुटबॉल खेळण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लहानपणी बिल्डिंग साफसफाईचे काम केलेल्यांची व्यूहरचना ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याच्या सहकाऱ्यांची डोकेदुखी ठरेल, अशी आशा बाळगली जात आहे. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील मोरोक्को-पोर्तुगाल लढतीची गणिते यावरच ठरणार आहेत. 

मॉस्को - फुटबॉल खेळण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लहानपणी बिल्डिंग साफसफाईचे काम केलेल्यांची व्यूहरचना ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याच्या सहकाऱ्यांची डोकेदुखी ठरेल, अशी आशा बाळगली जात आहे. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील मोरोक्को-पोर्तुगाल लढतीची गणिते यावरच ठरणार आहेत. 

इराणविरुद्ध मोरोक्कोला स्वयंगोल भोवला होता. त्यानंतर मोरोक्कोचे मार्गदर्शक हेर्वे रेनार्ड खूपच चिडले होते. आम्हीच आमच्यासाठी खड्डा खणला, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती; मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी 2012 मध्ये झांबियाला; तर त्यानंतर तीन वर्षांत आयव्हरी कोस्टला आफ्रिकन विजेतेपद जिंकून दिले आणि मोरोक्कोला विश्‍वकरंडक पात्रता. त्यांची हीच जादू पोर्तुगालला सतावणार आहे. 

कोणीही आम्हाला कमी लेखू नका. आम्ही पात्रच ठरणार नाही, हा अंदाज खोटा ठरला. आईसलॅंड अर्जेंटिनास रोखेल, असे कोणाला वाटले नव्हते. इच्छा असते तेव्हा मार्ग सापडतो. तेही आमच्यासारखीच माणसे आहेत. एका पराभवाने आम्ही मेलेलो नाही, ही मोरोक्को मध्यरक्षक फायकाल फाजीर यांची टिप्पणीच मार्गदर्शकांची व्यूहरचना दाखवते. 

रेनार्ड कमालीचे जिद्दी आहेत व हीच जिगर खेळाडूत निर्माण करतात आणि इतिहासही घडवतात. पंधराव्या वर्षी क्‍लबसाठी चाचणी देतानाच आपण कुठे आहोत, हे त्यांनी ओळखले होते, पण फुटबॉलची ओढ कमी होत नव्हती. त्यासाठी त्यांनी पहाटे उठून बिल्डिंगच्या साफसफाईचे काम केले आणि दिवसा हौशी संघांना मार्गदर्शन करण्यास सुरवात केली. क्‍लॉडे डे रॉय यांनी त्यांच्यातील गुणवत्ता हेरली आणि त्यांना सहायक नेमले. त्यानंतर इतिहास घडत गेला. आता त्याचीच चिंता रोनाल्डोला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ronaldo's headache for cleaning the building