esakal | ‘सकाळ सुपरस्टार कप’वर ऑल स्टार एफसीची मोहर
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाळुंगे-बालेवाडी - ‘सकाळ सुपरस्टार कप २०१८’मध्ये फुटबॉल खेळताना रणबीर कपूर (पिवळी जर्सी).

‘सकाळ सुपरस्टार कप’वर ऑल स्टार एफसीची मोहर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - रिमझिम पावसात शनिवारी रंगलेल्या ‘सकाळ सुपरस्टार कप २०१८’वर बॉलिवूड स्टारच्या ‘ऑल स्टार एफसी’ संघाने मोहर उमटविली. अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, दिनो मारियो, लिअँडर पेस यांच्या ‘ऑल स्टार एफसी’ने ‘व्हीटीपी इलेव्हन’ संघाचा तीन विरुद्ध शून्य गोलने पराभव केला.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा रंगतदार सामना झाला. उपस्थितांनी टाळ्या, शिट्ट्या वाजवून दाद दिली. यामध्ये लहान मुले, तरुण-तरुणी आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. 

सामन्याच्या प्रारंभी सायंकाळी साडेसहा वाजता नृत्य-कला पथकाकडून गणेश वंदनेने सुरवात झाली. राष्ट्रगीतानंतर दोन्ही टीमच्या कप्तानांनी सात वाजता टॉस उडविला. ऑल स्टार एफसीचे कप्तान अभिषेक बच्चन आणि व्हीटीपी इलेव्हनचा कप्तान सनिल देशपांडे यांच्यात टॉस झाला. त्यामध्ये अभिषेकने टॉस जिंकून पहिला डाव (स्कोरिंग साइड) सुरू केला. 

पहिल्या हाफमध्ये ४१ व्या मिनिटाला एएसएफसीकडून आदार जैन याने एक गोल केला. दुसऱ्या हाफमध्ये ७२ व्या मिनिटाला अरमान जैन याने दुसरा गोल, तर ७६ व्या मिनिटाला लिअँडर पेसने तिसरा गोल केला. अखेरच्या मिनिटापर्यंत व्हीटीपी इलेव्हनने कडवी झुंज दिली.

जीएस स्पोर्टस्‌च्या सहकार्याने ‘सकाळ’ने हा सामना आयोजित केला होता. ‘व्हीटीपी इलेव्हन’ हा संघ ‘व्हीटीपी रिॲलिटी’ यांनी प्रायोजित केला. पॉवर्ड बाय फिनोलेक्‍स पाइप्स आणि को-असोसिएटेड विथ टॅब कॅपिटल लि. (ऑनलाइन एसएमई फायनान्स), को-पॉवर्ड बाय क्वेस्ट टुर्स असलेल्या या स्पर्धेसाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बॅंकिंग पार्टनर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट एज्युकेशनल पार्टनर आणि आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट वेल्थ पार्टनर होते.

तरुणाई फुटबॉलमय ! 
‘सकाळ सुपरस्टार कप’च्या उद्‌घाटनप्रसंगी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल परिसरात भव्य कमान, फ्लेक्‍स, एलईडी स्क्रीन्स लावल्या होत्या. दणाणून सोडणारी डीजे सिस्टिम, भर पावसामध्ये बॉलिवूड स्टार्सची झलक मोबाईलमध्ये टिपण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि जल्लोषामुळे तरुणाई फुटबॉलमय झाली होती. 

loading image