अडखळत्या ब्राझीलला "जखमी' नेमार तारणार? 

वृत्तसंस्था
Friday, 22 June 2018

विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलवर क्वचितच साखळीत बाद होण्याची नामुष्की टाळण्यासाठी खेळण्याची वेळ आली असेल. पात्रतेपासून अडखळत असलेल्या ब्राझीलची मदार "जखमी' नेमारवरच आहे. 
 

सोची - विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलवर क्वचितच साखळीत बाद होण्याची नामुष्की टाळण्यासाठी खेळण्याची वेळ आली असेल. पात्रतेपासून अडखळत असलेल्या ब्राझीलची मदार "जखमी' नेमारवरच आहे. 

चर्चेत राहणे नेमारला आवडते, पण स्पर्धेचे वेध झाल्यापासून हीच चर्चा कमी झाली आहे. त्याऐवजी स्वित्झर्लंडने नेमारला कसे जखडले, त्याचा खेळ कसा बहरला नाही याची चर्चाच सुरू आहे. त्यामुळेच आता क्‍लबसाठीच खेळतो, राष्ट्रीय संघासाठी नाही अशी टिका सुरू झाली आहे. 

स्वित्झर्लंडविरुद्ध नेमारने खेळाची गती कमी करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी याचा संघास कितपत फायदा आहे, याचा त्याने विचारही केला नाही या फ्रान्सचे माजी बचावपटू मार्सेल देसाली यांच्या मताशी अनेक ब्राझीलवासिय सहमत आहेत. तो कधी कधी फुटबॉल हा सांघिक खेळ आहे हेही विसरतो असेही त्यांनी म्हटले आहे. 

नेमारला मंगळवारी सरावाच्यावेळी दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला सराव अर्धवट सोडावा लागला होता. आता तो बुधवारच्या सराव सत्रात सहभागी झाली असल्याचे ब्राझीलने सांगितले. मात्र, हा सराव पूर्णपणे बंदिस्त झाला. तो किती तंदुरुस्त आहे, हे केवळ ब्राझील संघव्यवस्थापनानेच जाणले. प्रत्यक्ष लढतीबाबत नेमारच्या तंदुरुस्तीबाबत तर्क वितर्कच लढवले जातील. अर्थात सलामीला घायाळ झालेला नेमार आपला ठसा उमटवण्यास उत्सुक असेल. त्यावरच ब्राझीलची मदार आहे. 

ब्राझीलचे प्रतिस्पर्धी कोस्टारिकाने गेल्या नऊपैकी सात लढती गमावल्या आहेत, पण त्यांनी सर्बियाविरुद्ध केलेला खेळ ब्राझीलला सहज विजय लाभणार नाही हेच दाखवणारा होता. कोस्टारिकाने एका किकवरच लढत गमावली, त्यामुळे त्याची ताकद दिसली आहे, असे ब्राझील आक्रमक कुटिन्होने सांगितले. 

वडिलांची गादी मुलगा चालवणार? 
सेल्सो बोर्गेस हा कोस्टा रिकाचा खेळाडू ब्राझीलविरुद्धच्या लढतीत वडिलांची गादी चालवणार आहे. सेल्सोच्या वडिलांचे बालपण ब्राझीलमध्ये गेले होते, पण ते 1990 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत कोस्टा रिकाकडून खेळले, एवढेच नव्हे तर 2002 स्पर्धेच्यावेळी मार्गदर्शकही होते. मी पक्का कोस्टारिकावासीय आहे, पण आमचे मूळ ब्राझीलमध्ये आहे हे विसरता येत नाही, असे सेल्सोने सांगितले. चार वर्षांपूर्वीच्या स्पर्धेच्यावेळी सेल्सो ब्राझीलमधील त्यांच्या कुटुंबीयांच्या रेसिफ या मूळ गावी गेला होता. त्याच ठिकाणी आम्ही इटलीस हरवले आणि बाद फेरी गाठली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: save to Brazil the injured Neymar?