esakal | सेहवाग म्हणतो फ्रान्स, इंग्लंड, क्रोएशिया विसरा अन् हे बघा...
sakal

बोलून बातमी शोधा

Sehwag tweets about football worldcup

भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग नेहमी हटके पद्धतीने आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवत असतो. यावेळी देखील फुटबॉल विश्वकरंडकाच्या धर्तीवर सेहवागने असाच एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

सेहवाग म्हणतो फ्रान्स, इंग्लंड, क्रोएशिया विसरा अन् हे बघा...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग नेहमी हटके पद्धतीने आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवत असतो. यावेळी देखील फुटबॉल विश्वकरंडकाच्या धर्तीवर सेहवागने असाच एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. 

या व्हिडिओमध्ये एक वृद्ध माणूस फुटबॉलला किक मारत छोट्याश्या खिडकीत बरोबर गोल करताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओला त्याने ''फ्रान्स, इंग्लंड, क्रोएशिया यांना विसरा आणि या फुटबॉलपटूचा खेळ पाहा.'' असे कॅप्शन दिले आहे. 

फुटबॉल विश्वकरंडकात आता उपांत्य फेरीचा एक आणि अंतिम सामना राहिलेला आहे. उपांत्य फेरी गाठलेल्या फ्रान्स, इंग्लंड आणि क्रोएशिया या तीनही संघानी अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केली असल्यामुळे विश्वविजेता कोण होणार याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सोशल मीडियावरही या आशयाचे अनेक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. त्यातच वीरेंद्र सेहवागनेही त्याच्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी हा व्हि़डिओ शेअर केला आहे. 

loading image