रोनाल्डोच्या थक्क करणाऱ्या गोलने युव्हेंटस चकित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 April 2018

टुरीन (इटली) - ख्रिस्तियानो रोनाल्डोने हवेत उलटी उडी (बायसिकल कीक) मारून केलेल्या प्रेक्षणीय गोलमुळे फुटबॉल जगत मंगळवारी थक्कच झाले. युव्हेंटसच्या पाठीराख्यांनी त्याला उभे राहून मानवंदना दिली. इतकेच नव्हे, तर रेयाल माद्रिदचे मार्गदर्शक झिनेदिन झिदान यांनीही आपण जे काही पाहिले त्यावर विश्‍वास बसत नव्हता, अशी भावना व्यक्त केली.

रोनाल्डोच्या रेयाल माद्रिदने युव्हेंटसचा चॅंपियन्स लीग उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्याच्या लढतीत ३-० असा पराभव केला. त्यात रोनाल्डोने दोन गोल केले, याची आकडेवारीत नोंद राहील; पण सर्वांसाठी रोनाल्डोचा गोल हेच सामन्याचे वैशिष्ट्य होते. ३३ वर्षीय पोर्तुगाल स्टारने हवेतून जात असलेल्या चेंडूला अंदाज घेत उडी मारत हवेत पाठीवर पडून  कीक मारत चेंडूला अचूक दिशा दिली. गोलरक्षक कळण्यापूर्वीच चेंडू गोलपोस्टच्या उजव्या कोपऱ्यात जाऊन स्थिरावला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cristiano ronaldo football competition