इंग्लंडच्या फुटबॉलपटूंना सॅंडविच खाण्यास मनाई

वृत्तसंस्था
Thursday, 22 March 2018

लंडन - इंग्लंडच्या फुटबॉलपटूंना सॅंडविच, मफीन तसेच तयार कॉफी मिश्रण घेण्यास मार्गदर्शक गॅरेथ साउथगेट यांनी मनाई केली आहे. सेंट जॉर्जेस पार्कवरील नॅशनल फुटबॉल सेंटरवर संघ सराव करीत आहे. राहण्याची व्यवस्था हिल्टन हॉटेलमध्ये आहे. तेथील स्टारबक्‍स स्टॉलवरून हे पदार्थ घेऊ नयेत. खेळाडूंना केवळ कॉफी, चहा व बाटलीबंद पाणी इतकेच देण्याची सूचना कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. यापूर्वी फॅबिओ कॅपेलो यांनी टोमॅटो केचअपवर बंदी घातली होती. याशिवाय पेप गार्डीओला यांनी मॅंचेस्टर सिटीच्या खेळाडूंना पिझ्झा खाण्यास तसेच वजन जादा आढळल्यास मुख्य संघाबरोबर सराव करण्यास मनाई केली होती.

लंडन - इंग्लंडच्या फुटबॉलपटूंना सॅंडविच, मफीन तसेच तयार कॉफी मिश्रण घेण्यास मार्गदर्शक गॅरेथ साउथगेट यांनी मनाई केली आहे. सेंट जॉर्जेस पार्कवरील नॅशनल फुटबॉल सेंटरवर संघ सराव करीत आहे. राहण्याची व्यवस्था हिल्टन हॉटेलमध्ये आहे. तेथील स्टारबक्‍स स्टॉलवरून हे पदार्थ घेऊ नयेत. खेळाडूंना केवळ कॉफी, चहा व बाटलीबंद पाणी इतकेच देण्याची सूचना कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. यापूर्वी फॅबिओ कॅपेलो यांनी टोमॅटो केचअपवर बंदी घातली होती. याशिवाय पेप गार्डीओला यांनी मॅंचेस्टर सिटीच्या खेळाडूंना पिझ्झा खाण्यास तसेच वजन जादा आढळल्यास मुख्य संघाबरोबर सराव करण्यास मनाई केली होती. मॅंचेस्टर युनायटेडच्या डेव्हिड मॉयेस यांनी सामन्याच्या आदल्यादिवशी चिप्स खाऊ नयेत असा दंडक घालून दिला होता. इंग्लंडचे माजी क्रिकेट प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी २०१३-१४च्या ॲशेस दौऱ्यादरम्यान तब्बल ८२ पानांचा अहवालच तयार केला होता. त्यात आहारविषयक सखोल विश्‍लेषण त्यांनी केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news England footballers are not allowed to eat sandwiches