नवी मुंबईत आजही पावसात खेळ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नवी मुंबई - नवी मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर उद्या (ता. ९) विश्‍वकरंडक सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील लढती होतील. उद्याही पावसाचा अंदाज असल्यामुळे चार संघांचा पुन्हा पावसात कस लागेल. 
या स्पर्धेत सलामीच्या दोन्ही लढती प्रामुख्याने पावसात झाल्या होत्या. त्यातच आगामी तीन दिवस वादळी; तसेच जोरदार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील दुसऱ्या टप्प्याच्या लढतीही पावसातच होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

न्यूझीलंडचे मार्गदर्शक डॅनी हे यांनी सध्या आमच्याकडे पाऊस सुरू आहे, त्यामुळे आम्हाला घरच्या वातावरणातच खेळल्यासारखे वाटले, असे सांगितले होते, मात्र त्याचवेळी त्यांनी माली-पॅराग्वे लढतीनंतर मैदानाची काय अवस्था होईल, अशी चिंताही व्यक्त केली होती.  पॅराग्वे आणि माली लढतीतील उत्तरार्धातील प्रतिस्पर्ध्यांचे कमी झालेले गोल हेच काहीसे दर्शवत होते. या संघाचे मार्गदर्शक लिओनार्ड सांचेझ यांनी गोल केल्यावर आमचे खेळाडू जल्लोष करीत होते, पाऊस सुरू असताना जास्त जोश दाखवला, त्यात भान हरपले तर त्याचा धोका असतो. दुखापत होण्याची धास्ती असते, असे त्यांनी सांगितले होते.

आज किती गर्दी होणार?
पहिल्या दिवसासाठी स्टेडियमवरील सर्व तिकिटांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले होते; पण प्रत्यक्ष लढतीस १८ हजार ७९७ चाहते उपस्थित होते. या स्टेडियमची क्षमता ४५ हजारहून जास्त आहे; पण जागतिक महासंघाने ३७ हजार तिकिटेच विक्रीस उपलब्ध केली होती. ही सर्व तिकिटे विकली गेली होती. अनेकांनी तिकिटे खरेदी केली, पण खूपच कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे चाहत्यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला असे सांगितले जात होते. चाहत्यांना स्टेडियममध्ये छत्र्या, इअरफोन नेण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे सुरक्षा प्रक्रिया पूर्ण होण्यास खूपच वेळ लागत होता. जोरदार वाऱ्यासह पाऊसही पडत होता. परिणामी चाहते परत गेले होते. आता दुसऱ्या लढतीसही चांगल्या प्रतिसादाबरोबर पावसाचेही वातावरण आहे, अशा परिस्थितीत किती गर्दी होणार याची चर्चा आज रंगली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news football competition