esakal | जर्मनीने उडविला नॉर्वेचा धुव्वा
sakal

बोलून बातमी शोधा

जर्मनीने उडविला नॉर्वेचा धुव्वा

जर्मनीने उडविला नॉर्वेचा धुव्वा

sakal_logo
By
पीटीआय

पॅरीस - युरोपियन विश्‍वकरंडक फुटबॉल पात्रता सामन्यात जर्मनीने नॉर्वेचा ६-० गोलने उडविला तर इंग्लंडने स्लोव्हकियाचे आव्हान २-१ असे परतवून लावले. जर्मनीच्या विजयात टिमो वेर्नरच्या दोन गोलचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या विजयामुळे ‘क’ गटात विश्‍वविजेत्या जर्मनीने आठ सामन्यात आठव्या विजयाची नोंद केली.

दुसऱ्या स्थानावर असलेल्या उत्तर आयर्लंडने झेक प्रजाकसत्ताकचा २-० गोलने पराभव केला. त्यामुळे जर्मनीला विश्‍वकरंडकात थेट प्रवेश मिळविणाऱ्यासाठी पाच ऑक्‍टोबरपर्यंत वाट पहावी लागेल. वेम्बले स्टेडियमवर झालेल्या सामन्यात तिसऱ्या मिनिटाला स्टॅनिस्लाव लोबोटकाने गोल करून स्लोव्हकियाला आघाडी मिळवून दिली. मात्र, मार्कस रशफोर्ड आणि एरीक डायर यांनी गोल  करून इंग्लंडला विजय मिळवून दिला. ‘फ’ गटात इंग्लंड स्लोव्हकियापेक्षा पाच गुणांनी आघाडीवर असून थेट पात्रता मिळविण्यासाठी त्यांना स्लोव्हनिया आणि लिथवुनियाविरुद्ध फक्त दोन गुण मिळवायचे आहेत. अन्य सामन्यात स्कॉटलंडने माल्टाचा २-० गोलने पराभव करून आपल्या आशा जिवंत ठेवल्या. ‘ई’ गटात पोलंडने कझाकिस्तानचा ३-० तर डेन्मार्कने अर्मेनियाचा ४-१ गोलने पराभव केला.