फुटबॉल क्रमवारीत भारताचे स्थान घसरले

पीटीआय
Friday, 11 August 2017

नवी दिल्ली - भारतीय फुटबॉल संघाचे ‘फिफा’ क्रमवारीतील स्थान एकने घसरले असून, ‘फिफा’ने गुरुवारी जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत ते ९७व्या स्थानावर आले आहेत. जुलै महिन्यात भारतीय संघ एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नसल्यामुळे क्रमवारीत घसरण झाल्याचे मानले जाते. भारताचे ३४१ मानांकन गुण आहेत. ‘कॉन्ककॅफ’ स्पर्धेतील चमकदार कामगिरीने कॅनडा ९५व्या स्थानापर्यंत आले आहेत. यामुळेच भारताला एक क्रमांक खाली यावे लागले.

आशियाई क्रमवारीत भारत १२व्या स्थानी आहे. आशियात आघाडीवर असणारा इराण संघ ‘फिफा’ जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानी आहे. भारतीय संध आता चॅंपियन्स करंडक स्पर्धेत खेळणार असून, या स्पर्धेत मॉरिशस, सेंट किट्‌स, नेवीस हे देश सहभागी होणार आहेत. ब्राझीलने जर्मनीकडून अव्वल स्थान हिसकावून घेतले आहे. अर्जेटिना, स्वित्झर्लंड, पोलंड अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news football india