वर्ल्डकप ड्रॉभोवती फिक्‍सिंगच्या संशयाचे जाळे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 डिसेंबर 2017

मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉलच्या संयोजनासाठी जागतिक फुटबॉल पदाधिकाऱ्यांनी लाच घेतल्याच्या आरोपाचा धुरळा खाली बसत असतानाच या स्पर्धेचा ड्रॉही फिक्‍स केला जात असल्याचे संकेत मिळत आहेत. रशियात पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेचा ड्रॉ उद्या (ता. १) काढण्यात येईल.

मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉलच्या संयोजनासाठी जागतिक फुटबॉल पदाधिकाऱ्यांनी लाच घेतल्याच्या आरोपाचा धुरळा खाली बसत असतानाच या स्पर्धेचा ड्रॉही फिक्‍स केला जात असल्याचे संकेत मिळत आहेत. रशियात पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेचा ड्रॉ उद्या (ता. १) काढण्यात येईल.

वर्ल्डकप स्पर्धेच्या ड्रॉची रंगीत तालीम झाली. त्यात यजमान रशियाला गटात, स्पर्धेत सर्वांत दुबळा समजला जाणारा पेरू हा संघ आला. त्यामुळे या स्पर्धेचा ड्रॉ फिक्‍स असल्याची चर्चा सुरू झाली. गतवर्षी महासंघाचे माजी अध्यक्ष सेप ब्लॅटर यांनी ताकदवान आणि कमी ताकदवान संघातील फरक दाखविण्यासाठी त्यांचे काचेच्या पॉटमधील चेंडू ऊबदार आणि थंड असा फरक करून ठेवलेले असतात असा दावा केला होता. गतस्पर्धेत अर्जेंटिनास गटात नायजेरिया, इराण आणि बोस्निया हे तीनही काहीसे कमकुवत संघ आले होते, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले. त्यावर ब्लॅटर यांनी घाईघाईने वर्ल्डकपचा ड्रॉ याप्रकारे फिक्‍स होत नाही. युरो स्पर्धेत हे घडत असल्याचा दावा केला होता. आता स्पर्धा युरोपातच होत आहे, त्यातच ड्रॉच्या रंगीत तालमीत रशिया आणि पेरू एकाच गटात असल्यामुळे ड्रॉ फिक्‍स होत असल्याची चर्चा सुरू आहे.

चेंडूची कोणत्याही प्रकारे विभागणी झालेली नसते. ते सर्व सारखेच असतात. पॉटमध्ये काही लाल चेंडू असतात, पण त्याचा हेतू ठरलेला असतो. स्पर्धेची गटवारी कोणत्याही प्रकारे फिक्‍स नसते, असे ‘फिफा’चे स्पर्धा संचालक ख्रिस उंगर यांनी सांगितले.

फिफाच्या स्पष्टोक्तीनंतरही पॉटमधील चेंडूची वर्गवारी करता येते. ड्रॉपूर्वी काही चेंडू रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ते जास्त गार होतील. त्यातील संघ कसा आहे याची कल्पना येते, असे ब्लॅटर यांनी सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news football world cup