फुटबॉल वर्ल्ड कपवर इंग्लंडचा बहिष्कार?

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 21 March 2018

लंडन/मॉस्को - रशियाच्या माजी गुप्तहेरावर ब्रिटनमध्ये विषप्रयोग करण्याचे प्रकरण चिघळले असून, या प्रकरणामुळे इंग्लंडचा संघ रशियात होणाऱ्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहे. 

रशियाच्या मंत्र्यांनीही याबाबतची शक्‍यता वर्तवल्यामुळे इंग्लंड बहिष्कार टाकण्याचा विचार करत असलेल्या वृत्तास एकप्रकारे पुष्टीच मिळाली आहे.

ब्रिटनमधील कोणीही मंत्री तसेच राजघराण्यातील कोणीही व्यक्ती विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेवेळी रशियात जाणार नसल्याचे पंतप्रधान थेरेसा मे यांनी सांगितले आहे, तर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री बोरीस जॉन्सन यांनी रशियास आम्ही चोख प्रत्त्युतर देणार आहोत, ते रशिया कधीही विसरणार नाही, असे सांगितले आहे. त्यांनी विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा बहिष्काराचा इशाराच त्यातून दिला असल्याचे सांगितले जात आहे. 

इंग्लंडने विश्‍वकरंडकावर बहिष्कार टाकल्यास दोन देशांतील संबंध बिघडतील, असे रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Football World Cup England boycott