मेस्सीच्या लग्नाचा मांडव सजला...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

रोसारिओ - आधुनिक फुटबॉलचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी उद्या बोहल्यावर चढत आहे. जगभरातील क्रीडा क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या मेस्सीच्या या विवाहासाठी मांडव सजला आहे. बालपणीची मैत्रीण अँटोनेला रोकुझ्झोबरोबर मेस्सीच्या लग्नाचा बार उडणार आहे आणि त्यासाठी दिग्गज वऱ्हाडी येणार आहेत, त्यामध्ये मेस्सीचा बार्सिलोनातील सहकारी गेरार्ड पिके आणि त्याची पत्नी पॉप स्टार शकिराचाही समावेश आहे.

मेस्सी अर्जेंटिनाचा असला तरी त्याचे फुटबॉल विश्‍व स्पेनमधील बार्सिलोना क्‍लब हे आहे. त्यामुळे स्पेनमधूनही अधिक पाहुणे येणार आहेत. बार्सिलोनातील त्याचे सहकारी ब्राझीलचा नेमार, लुईस सुआरेझ असे एकूण २५० पर्यंत वऱ्हाडी असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ३० वा वाढदिवस साजरा करणाऱ्या मेस्सीची २९ वर्षीय मैत्रीण रोकुझ्झो यांना दोन मुले आहेत. ४ वर्षीय थियागो आणि एका वर्षाचा मॅटिओ अशी त्यांची नावे आहेत. उद्याच्या लग्नसोहळ्यासाठी रोकुझ्झो जगप्रसिद्ध स्पॅनिश डिझायनर रोसा क्‍लाराने तयार केलेला ड्रेस परिधान करणार आहे. क्‍लाराने हॉलिवूड स्टार इवा लोंगोरिया आणि सोफिया वर्गेरा यांच्यासह स्पेनची राणी लेतिझिया यांच्या ड्रेसचे डिझाइन केलेले आहे. या लग्नसोहळ्यासाठी जगभरातील १५५ पत्रकारांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. हा हायप्रोफाइल सोहळा असल्यामुळे निमंत्रितांशिवाय कोणालाही प्रवेश करता येणार नाही.

Web Title: sports news lionel messi wedding