esakal | गोल करताना रोनाल्डोच्या डोक्‍याला दुखापत
sakal

बोलून बातमी शोधा

गोल करताना रोनाल्डोच्या डोक्‍याला दुखापत

गोल करताना रोनाल्डोच्या डोक्‍याला दुखापत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

माद्रिद - स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या दोन गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने दुबळ्या देपोर्तिवोला कोरूना संघाचा स्पॅनिश लीगमध्ये ७-१ असा पराभव केला.

रोनाल्डोने या लीगमध्ये संपवलेला गोलदुष्काळ, रेयालची पिछाडी यापेक्षाही त्याला दुसरा गोल करताना झालेल्या दुखापतीची जास्त चर्चा झाली आणि ते स्वाभाविकच होते. 

रोनाल्डो गोल करीत असताना प्रतिस्पर्धी संघातील फॅबियन शार याने चेंडू किक करण्याचा प्रयत्न केला. त्यात फॅबियनची किक रोनाल्डोच्या डोक्‍यावर लागली. त्याला जबर दुखापत झाली. तो रक्तबंबाळ झाला. त्याचा शर्टही रक्ताने माखला. रोनाल्डोने चेहऱ्यावरील रक्त पुसल्यावर फिजिओंचा स्मार्टफोन घेऊन कपाळावरील दुखापतीची तीव्रता बघितली. ही क्‍लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.