बंगालला हरवून केरळने पटकावला ‘संतोष करंडक’

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 April 2018

कोलकाता - केरळाने गतविजेत्या बंगालचा पेनल्टी शूट आउटमध्ये ४-२ असा पराभव करून संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविले. त्यांनी तेरा वर्षांनी या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. नियोजित वेळेत सामना १-१ आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेनंतर २-२ असा बरोबरीत सुटला होता. संपूर्ण सामन्यात केरळकडून एम. एस. जितीन, विबिन थॉमस, तर बंगालकडून जिते मुर्मू आणि तीर्थंकर सरकार यांनी गोल केले. शूटआउटमध्ये बंगालने गोलरक्षक बदलला; पण त्यांना यश आले नाही. उलट केरळचा गोलरक्षक ही मिधून याने बंगालच्या दोन किक अडवून विजयात मोलाचा वाटा उचलला.

6 - केरळचे विजेतेपद
2005 - यापूर्वी केरळचे विजेतेपद
5 - वर्षांनंतर केरळ अंतिम फेरीत
33 - बंगालची राष्ट्रीय जेतेपदे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news santosh karandak football competition