esakal | वसाहतीवर फ्रान्सचे वर्चस्व
sakal

बोलून बातमी शोधा

वसाहतीवर फ्रान्सचे वर्चस्व

वसाहतीवर फ्रान्सचे वर्चस्व

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गुवाहाटी - न्यू कॅलेडोनिया ही ओशियानातील फ्रान्स वसाहत. कदाचित त्यामुळे फ्रान्सने विश्‍वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत त्यांच्यावर उत्तरार्धात काहीशी दया दाखवली असेल, पण त्यापूर्वी त्यांनी पूर्वार्धात सहा गोल केले होते आणि ७-१ असा धडाकेबाज विजय मिळविला.

लेस ब्ल्यूजचे खाते पाचव्या मिनिटास स्वयंगोलने उघडले खरे, पण त्यांनी त्यांच्या आक्रमकांनी जवळपास २३ मिनिटांत पाच गोलची मेजवानी आपल्या पाठीराख्यांना दिली. सामना संपण्याच्या सुमारास कॅलेडोनियाने खाते उघडले खरे, पण त्याचा आनंद त्यांना फार लाभू न देता भरपाई वेळेतील पहिल्या मिनिटास गोल करत दोन संघांतील सहा गोलचे अंतर फ्रान्सने कायम ठेवले.
उत्तरार्धात फ्रान्स आक्रमणाचा जोष काहीसा कमी झाला, पण न्यू कॅलेडोनियाने बचावावर जास्त भर दिला. पूर्वार्धात फ्रान्स आक्रमकांना एकट्याने आव्हान देत असलेला गोलरक्षक उने केसिने याला साथ दिली. याच केसिने याने फ्रान्सला पेनल्टी किकवर गोलही दिला नाही.

चिलीसाठी इंग्लंड तिखट
कोलकाता - यंग लायन्स संबोधले जाणाऱ्या इंग्लंडने जोरदार सुरुवात करताना चिलीचा ४-० असा धुव्वा उडविला. जॅडॉन सांचो याच्या दोन गोलच्या जोरावर इंग्लंडने विजय सुकर केला. इंग्लंडने पाचव्याच मिनिटास गोल करत ही लढत एकतर्फी होणार असल्याचे स्पष्ट केले. हा गोल करणाऱ्या हडसन ऑदी याला उत्तरार्धात बदलण्यात आले. त्याच्याऐवजी आलेल्या अँगेल गोम्सने चौथा गोल केला. पूर्वार्धात एक गोल केलेल्या इंग्लंडने उत्तरार्धात आक्रमणे जास्त तिखट केली होती.

loading image