esakal | जपानचाही गोल धडाका
sakal

बोलून बातमी शोधा

जपानचाही गोल धडाका

जपानचाही गोल धडाका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गुवाहाटी - विश्‍वकरंडक (१७ वर्षांखालील) फुटबॉल स्पर्धेत जपानने जबरदस्त सलामी दिली. त्यांनी रविवारी झालेल्या सामन्यात पूर्वार्धात, तसेच उत्तरार्धात प्रत्येकी तीन गोल करीत होंडुरासचा ६-१ असा सहज पराभव केला. जपानच्या या धडाक्‍यामुळे गुवाहाटीतील चाहत्यांनी दोन सामन्यांत १५ गोलांचा धडाका पहिल्याच दिवशी अनुभवला. 

केईटो नाकामुराचे तीन गोल हे जपानच्या विजयाचे वैशिष्ट्य. पहिल्या गोलसाठी त्यांना बावीस मिनिटे प्रतीक्षा करावी लागली; पण त्यानंतर त्यांनी तेवीस मिनिटांत चार गोल करीत लढतीचा निकालच स्पष्ट केला. उत्तम तांत्रिक तसेच कमालीचा कौशल्यपूर्ण खेळ करणाऱ्या जपानला रोखणेच होंडुरासला अवघड झाले. नाकामुराने हेडरने सुरवात केली, त्यानंतर उत्तम ड्रिबलिंग दाखवले. त्याने ताकदवान किक दिली. 

इराक-मेक्‍सिको बरोबरी
इराक आणि मेक्‍सिको ही लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. इराकने पूर्वार्धातील सोळाव्या मिनिटास, तर मेक्‍सिकोने उत्तरार्धातील सहाव्या मिनिटास गोल केला. चेंडूवर एकतर्फी वर्चस्व राखलेल्या मेक्‍सिकोला सदोष नेमबाजीचा फटका बसला. त्यांना दहा कॉर्नर तसेच  फ्री किकचा फायदा घेता आला नाही. दोन वेळचे विजेते मेक्‍सिको हे दक्षिण अमेरिकन विजेते, तर इराक आशियाई विजेते. या दोन विभागीय विजेत्यात पूर्वार्धात चुरस होती; पण उत्तरार्धात मेक्‍सिकोने एकतर्फी हुकुमत राखली, पण महंमद दाऊदची प्रतिआक्रमणे मेक्‍सिकोला पूर्ण धडाक्‍यापासून रोखत होती. त्यामुळे इराकने स्पर्धा इतिहासातील पहिला गुण मिळविला.

loading image