आम्ही घानाला हरवू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 October 2017

नवी दिल्ली - १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक गोल केलेल्या जिकसन थौनाओजाम याने यजमान संघाच्या आव्हानाबद्दल आत्मविश्‍वास व्यक्त केला. ‘आम्ही पदार्पण करीत असलो तरी घानाला हरविण्याचा विश्‍वास आहे,’ असे तो म्हणाला.

‘अ’ गटातील अखेरच्या सामन्यात भारतासमोर गुरुवारी घानाचे आव्हान असेल. या लढतीत भारताला विजय अनिवार्य आहे. फिफाच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, की ‘आम्ही सारे खेळाडू सांघिक खेळ करू आणि विजयासाठी झुंज देऊ.’

जिकसनने नेहरू स्टेडियमवरील ४६ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने गोल केला. संजीव स्टॅलीनने कॉर्नरवर निर्माण केलेल्या संधीचे त्याने सोने केले. याविषयी तो म्हणाला, ‘मला गोल करण्याची संधी नेहमीच मिळत नाही. त्यामुळे मी फार रोमांचित झालो आहे. गोल नोंदविण्याची संधी दिल्याबद्दल मी संघातील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. चेंडू माझ्या दिशेने येईल, असा विचार मी करीत होतो. त्यामुळे मी सारे लक्ष चेंडूवर केंद्रित केले होते. संधी मिळताच मी ‘हेडिंग’ केले.’

भारतीय संघ विजयास पात्र होता, असे जिकसनला वाटते. त्याने सांगितले, ‘मी फिफा मुख्य स्पर्धेत भारताचा पहिला गोल केल्याचा आनंद आहे, पण आम्ही जिंकलो असतो तर या कामगिरीची गोडी आणखी वाढली असती. आम्हाला आंतरराष्ट्रीय फुटबॉलविषयी खूप धडे मिळाले.’

बाद फेरी गाठली नाही तरी एका ऐतिहासिक वाटचालीत योगदान दिल्याचा अभिमान कायम राहील. आमच्या संघाने प्रतिस्पर्ध्याचा पहिला गोल झाल्यानंतरही हार मानली नाही. आम्हाला दुःख झाले होते, पण आम्ही पूर्वीच्याच प्रयत्नाने खेळत राहिलो. त्यामुळे गोल करता आला, असेही जिकसनने नमूद केले.

भारत विश्‍वकरंडक स्पर्धेत प्रथमच खेळत आहे. मीच नव्हे तर सारा देश या स्पर्धेसाठी रोमांचित झाला आहे. मी इतिहासाचा भाग बनलो आहे. मी फार आनंदित आणि रोमांचित झालो आहे.
- जिकसन थौनाओजाम

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news worldcup football competition