esakal | फेडॉरच्या हॅटट्रिकने बंगळूर अंतिम फेरीत
sakal

बोलून बातमी शोधा

फेडॉरच्या हॅटट्रिकने बंगळूर अंतिम फेरीत

फेडॉरच्या हॅटट्रिकने बंगळूर अंतिम फेरीत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भुवनेश्‍वर - मध्यंतराची एका गोलची पिछाडी आणि उत्तरार्धात दहा खेळाडूंसह खेळावे लागल्यानंतरही बंगळूर एफसीने मंगळवारी मोहन बागानचा ४-२ असा पराभव करून सुपर करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उत्तरार्धात निकोलास फेडॉरने नोंदवलेली हॅटट्रिक त्यांच्या विजयात निर्णायक ठरली.

कलिंगा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पूर्वार्धाच्या अखेरच्या टप्प्यात ४२व्या मिनिटाला दीपांदा डिकाने गोल करून बागानला आघाडीवर नेले. त्यानंतर कमालीच्या वेगवान झालेल्या उत्तरार्धात बंगळूरकडून निकोलस फेडॉरने ६२, ६५ आणि ८९व्या मिनिटाला गोल करून बंगलूरला आघाडीवर नेले. त्यानंतर ९०व्या मिनिटाला सुनील छेत्रीने आघाडी वाढवली. सामन्याच्या भरपाई वेळेत डिक्काने आणखी एक गोल नोंदवला.

loading image