esakal | प्रतिस्पर्ध्यांच्या ताकदीनुसार डावपेच बेल्जियमचे प्रशिक्षक मार्टिनेझ यांचे तंत्र
sakal

बोलून बातमी शोधा

The technique of strategic coach Martinez according to the strength of the opponent

प्रतिस्पर्ध्यांच्या ताकदीनुसार डावपेच बेल्जियमचे प्रशिक्षक मार्टिनेझ यांचे तंत्र

sakal_logo
By
वृत्तसंस्था

सोची- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलसारख्या बलाढ्य संघाचे आव्हान संपुष्टात आणणाऱ्या बेल्जियमचे प्रशिक्षक रॉब्रेटो मार्टिनेझ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ब्राझीलला रोखण्याची केलेली तयारी आणि डावपेचांची अचूक अंमलबजावणी हे मार्टिनेझ यांच्या यशाचे गमक आहे. 

तांत्रिक आणि आक्रमक डावपेचांची आखणी करण्यात मार्टिनेझ वाकबगार आहेत. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ब्राझीलच्या टिटे यांच्या डावपेचांवर मार्टिनेझ भारी ठरले. एखाद्या सामन्यासाठी जेव्हा एखाद्या विशिष्ट पद्धतीची रणनीती आखतो, तेव्हा खेळाडू म्हणून प्रत्येक खेळाडूने त्या जबाबदारीत खेळ करणे आवश्‍यक असते. आमच्या काही खेळाडूंनी दोन दिवसांत स्वतःच्या मानसिकतेत बदल केला आणि संघाच्या गरजेनुसार खेळ केला. खरं तर याचा डावपेचांशी संबंध नाही, इच्छाशक्ती असणे महत्त्वाचे असते. प्रत्येक जण विजयासाठीच खेळत होता, त्यामुळे प्रशिक्षक म्हणून मला प्रत्येक खेळाडूचा अभिमान आहे, असे मत मार्टिनेझ यांनी मांडले. 

ब्राझीलचा हुकमी मार्सिलो तंदुरुस्त असो वा नसो. सर्बिया आणि मेक्‍सिकोविरुद्ध तो खेळला नव्हता. तो आमच्याविरुद्ध खेळणार याबाबत अनिश्‍चितता असली तरी ब्राझीलकडे आघाडी फळीतील चांगले खेळाडू आहेत. कोणीही समोर असला तरी त्यांना रोखण्यासाठी आम्ही रोमेलू लुकाकूचे अस्त्र वापरले, असे गुपित मार्टिनेझ यांनी जाहीर केले. 

लुकाकूने मिरांडा आणि केविन डी ब्रुयन यांना निष्प्रभ केल्यावर ब्राझीलची ताकद कमी झाली. लुकाकूच्या वेगाशी सामना करता करता ब्राझीलच्या खेळाडूंची दमछाक होत होती.