क्रूस क्षेपणास्त्राने कोरियासही संजीवनी 

वृत्तसंस्था
Monday, 25 June 2018

टोनी क्रूसने सामन्यातील काही सेकंद बाकी असताना सोडलेल्या चेंडूरूपी क्षेपणास्त्राने जर्मनीच्या विश्‍वकरंडक मोहिमेतच जानच ओतली नाही, तर कोरियाच्याही आशा जिवंत केल्या.

सोची - टोनी क्रूसने सामन्यातील काही सेकंद बाकी असताना सोडलेल्या चेंडूरूपी क्षेपणास्त्राने जर्मनीच्या विश्‍वकरंडक मोहिमेतच जानच ओतली नाही, तर कोरियाच्याही आशा जिवंत केल्या. 

जर्मनी-स्वीडन लढत बरोबरीत सुटली असती तर कोरियाचे आव्हान संपणार, हे निश्‍चित होते. या परिस्थितीत कोरियास मेक्‍सिको (6) आणि स्वीडनला (4) मागे टाकण्याची कोणतीही संधी नव्हती; पण गतविजेत्यांच्या विजयामुळे जर्मनी आणि स्वीडनचे प्रत्येकी तीन गुण झाले. कोरिया अखेरच्या लढतीत जर्मनीस हरवून बाद फेरीची आशा आता बाळगू शकते. 

हेही होऊ शकते 
- अखेरच्या फेरीत मेक्‍सिको-स्वीडन आणि जर्मनी-कोरिया लढती, या दोन लढतींतील ठिकाणात 965 कि.मी. अंतर 
- स्वीडनने मेक्‍सिकोला आणि जर्मनीने कोरियास हरवले तर या परिस्थितीत गोलफरक निर्णायक, सध्या तरी यात मेक्‍सिकोची (+2) आघाडी, जर्मनी आणि स्वीडनचे समान, प्रत्येकी 0 
- दोन्ही लढती बरोबरीत सुटल्यास मेक्‍सिको अव्वल; तर जर्मनी दुसरे होऊ शकतील. जर्मनीने स्वीडनला हरवल्याने गुण तसेच गोलफरक समान असला तरी दोघांतील लढतीत जर्मनी अव्वल 
- मेक्‍सिको तसेच जर्मनीने अखेरची लढत जिंकल्यास मेक्‍सिको अव्वल 
- गट उपविजेत्याची ब्राझीलविरुद्ध लढत अपेक्षित, त्यामुळे मेक्‍सिको अर्थातच विजयासाठी जास्त उत्सुक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Toni Kroos Saves Germanys World Cup Dreams