..तर आम्ही स्वखर्चाने भारतीय फुटबॉल संघ स्पर्धेसाठी पाठवू!

पीटीआय
सोमवार, 2 जुलै 2018

नवी दिल्ली : भारतीय ऑलिंपिक महासंघाच्या (आयओए) वागणुकीमुळे संतप्त झालेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) स्वखर्चाने संघ आशियाई क्रीडा स्पर्धेस पाठविण्याची तयारी दर्शविली. एकीकडे विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा 'फिव्हर' भारतामध्येही पसरलेला असताना 'आयओए'च्या या निर्णयावर 'एआयएफएफ'ने नाराजी व्यक्त केली आहे. 'यासंदर्भात अधिकृतरित्या निर्णय कळविण्याची तसदीही 'आयओए'ने घेतलेली नाही', असे 'एआयएफएफ'ने म्हटले आहे. 

'आयओए'च्या नियमावलीनुसार, खंडामध्ये पहिल्या आठ क्रमांकांमध्ये असलेल्या राष्ट्रीय संघासच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी अधिकृत नामांकन दाखल करण्याची परवानगी आहे. आशियामध्ये भारतीय संघ सध्या 14 व्या क्रमांकावर आहे. गेल्या दोन वर्षांत भारताने फुटबॉलमध्ये 173 व्या क्रमांकाहून 97 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 'आम्ही 'आयओए'ला पत्र लिहून या निर्णयाविषयीच्या आमच्या भावना पोचविल्या आहेत. फुटबॉलमध्ये नेमकं काय सुरू आहे, हेच त्यांना माहीत नाही. 'खर्च' हाच मुद्दा असेल, तर आम्ही स्वखर्चाने भारताचा संघ स्पर्धेला पाठवू', असे 'एआयएफएफ'चे सचिव कुशल दास यांनी सांगितले. 

भारतीय संघाच्या राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च महासंघ करणार असेल, तरीही आशियाई स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 'एआयएफएफ'ला 'आयओए'च्या परवानगीची गरज आहे. या प्रकरणी क्रीडा मंत्रालयाकडे दाद मागणार असल्याचे दास यांनी सांगितले. 

'आयओए'च्या या धोरणामुळे 1994 नंतर प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघ नसेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We are ready to send Indian football team to Asian Cup on Own cost