विश्‍वकरंडक विजेतेपदाचा फ्रान्सचा 'जल्लोष' 

world cup winrar France enjoying
world cup winrar France enjoying

पॅरिस : जगज्जेत्या फ्रान्सने विश्‍वकरंडक विजयाचा आनंद चाहत्यांसोबत मैदानावर साजरा करताना यूएफा नेशन्स लीगमध्ये नेदरलॅंडस्‌चे आव्हान 2-1 असे परतवले. ऑलिव्हर गिरॉड याने बेंजामिन मेंडी याच्या क्रॉसवर 75 व्या मिनिटास निर्णायक गोल केला. गिरॉडला विश्‍वकरंडक स्पर्धेत एकही गोल करता आला नव्हता. विश्‍वकरंडक विजयानंतर प्रथमच मायदेशात खेळणाऱ्या फ्रान्सचे खाते एम्बापे याने उघडले होते, तर उत्तरार्धाच्या सुरवातीस रायन बाबेल याने नेदरलॅंडस्‌ला बरोबरी साधून दिली. 

स्टेड डे फ्रान्सवर आपल्या संघास प्रोत्साहित करण्यासाठी 80 हजार चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यांनी सामना संपल्याची शिट्टी झाल्यावर जोरदार जल्लोष केला. हा विजय मोलाचाच आहे, आता पार्टी होणारच असे फ्रान्सचे मार्गदर्शक दिदिएर देशॅम्प यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी ऑलिव्हरचे खास कौतुक केले. विश्‍वकरंडक स्पर्धेत त्याने गोल केले नसले तरी त्यासाठीचा पाया रचण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. आता त्याच्या गोलने आम्हाला विजयी केले. 

विश्‍वकरंडक जिकल्यानंतर मायदेशात दाखल झाल्यावर फ्रान्स संघाचा स्वागत सोहळा झटपट उरकण्यात आला होता. त्या वेळी गर्दी केलेल्या तीन लाख चाहत्यांची निराशा झाली होती. फ्रान्स फुटबॉल पदाधिकाऱ्यांनी याची जाणीव ठेवत लढत संपल्यावर जगज्जेत्यांची खास ओळख करून दिली. विश्‍वकरंडकही मैदानात आणला गेला. 

अन्य लढतीत - ब विभाग : युक्रेन वि. वि. स्लोवाकिया 1-0. डेन्मार्क वि. वि. वेल्स 2-0. क विभाग : बल्गेरिया वि. वि. नॉर्वे 1-0. सायप्रस वि. वि. स्लोवेनिया 2-1. ड विभाग : जॉर्जिया वि. वि. लॅटविया 1-0. एफवायआर मॅसेडोनिया वि. वि. आर्मेनिया 2-0. लिएश्‍तेएनस्टेईन वि. वि. जिब्राल्टर 2-0. 

बॅलोतेलीस अखेर इटलीचा डच्चू 
इंग्लंडविरुद्ध निराशा केल्यामुळे इटलीने मारिओ बॅलोतेली याला वगळण्याचे ठरवले आहे. विश्‍वकरंडकास इटली अपात्र ठरल्यापासून बॅलोतेलीवर टीका सुरू आहे. आता तो पूर्ण तंदुरुस्त नसल्याचे सांगितले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com