युवा संघाच्या प्रशिक्षकपदी निकोलायच - प्रफुल पटेल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

नवी दिल्ली - भारतीय 17 वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निकोलाय ऍडम हेच राहणार असल्याचे भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बुधवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली - भारतीय 17 वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निकोलाय ऍडम हेच राहणार असल्याचे भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बुधवारी स्पष्ट केले.

भारतीय युवा फुटबॉल संघ रशिया दौऱ्यावर होता. या दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी सुमार झाली होती. त्यानंतर प्रशिक्षक निकोलाय यांच्या हकालपट्टीचे वृत्त चर्चेत होते. या विषयी पटेल म्हणाले, 'प्रशिक्षक निकोलाय यांच्या हकालपट्टीच्या वृत्ताने आम्हाला आश्‍चर्याचाच धक्का बसला. अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही. हे वृत्त खोटे आहे. निकोलाय यांच्याशी आपण स्पर्धेतील कामगिरीविषयी चर्चा केली असून, भविष्यातील योजनादेखील आखल्या आहेत.''

भारतीय फुटबॉल महासंघ देशातील फुटबॉल प्रसार आणि नव्याने गुणवत्ता शोध मोहीम राबवत आहे. यासाठी योग्य नियोजन आणि खेळाडूंसाठी सुविधा याला आमचे प्राधान्य असेल, असेही पटेल यांनी सांगितले. भारतीय युवा संघाला आतापर्यंत परदेशात सरावाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आता 1 फेब्रुवारीपासून भारतीय संघ गोवा येथे सराव करेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth team trainer Nicolai Adam