कुमार हॉकीत भारतास विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

मुंबई - भारतीय कुमार संघाने युवा ऑलिंपिक पात्रता हॉकी स्पर्धेतील मलेशियाविरुद्धच्या अंतिम लढतीत अखेरच्या सेकंदात गोल स्वीकारला, पण गोलरक्षक प्रशांत चौहानने शूटआउटमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे भारताने विजेतेपद पटकावले. 

बॅंकॉकला झालेल्या या स्पर्धेत भारतीय मुलींना चीनविरुद्धच्या अंतिम लढतीत १-४ अशी हार पत्करावी लागली, पण त्यांनीही यापूर्वीच युवा ऑलिंपिकची पात्रता साध्य केली होती. पाच जणांचा संघ असलेल्या या स्पर्धेतील लढत तीस मिनिटांची असते. मुलांच्या अंतिम लढतीत शूटआऊट २-१ असा जिंकत भारतीयांनी बाजी मारली. 

भारतीय मुलांच्या खेळात कमालीचे चढउतार होते. पहिल्या दहा मिनिटांतील गोलशून्य बरोबरीनंतर खेळ वेगवान झाला. सुरवातीच्या पिछाडीनंतर दोन मिनिटांत दोन गोल करीत भारताने आघाडी घेतली. पंधराव्या मिनिटास गोल करीत मलेशियाने २-२ बरोबरी साधली, अखेरच्या दहा मिनिटांत मलेशिया पुन्हा आक्रमक झाले. त्यातच अखेरच्या मिनिटात गोल स्वीकारण्याचे भारतीयांचे दुखणे उफाळून आले. २६ व्या मिनिटास बरोबरी स्वीकारली आणि अक्षरशः अखेरच्या सेकंदात भारतीयांनी बरोबरीचा गोल स्वीकारला. 

शूटआउटमध्ये भारतीय गोलरक्षक विजय चौहान प्रभावी ठरला. त्याने एक प्रयत्न रोखला. त्यानंतरच्या मलेशिया आक्रमकावर दडपण आणत त्यांना चूक करण्यास भाग पाडले. भारतीयांनी याच वेळी दोन प्रयत्नांत गोल केले. 

मार्गदर्शक शूअर्ड मरिन यांना जीवदान?
मुंबई ः राष्ट्रकुल क्रीडा अपयशानंतर शूअर्ड मरिन यांना भारतीय हॉकी संघाच्या मार्गदर्शकपदी कायम ठेवण्याचा निर्णय झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रकुल स्पर्धेतील अपयशाचा अहवाल मंगळवारी जाहीर  होण्याची शक्‍यता आहे.  मरिन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर मायदेशात म्हणजे नेदरलॅंड्‌सला गेले आहेत. ते अद्याप भारतात परतलेले नाहीत. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू झालेल्या शिबिरातही दाखल झालेले नाहीत. मात्र मरिन यांना व्हिसा मिळण्यात काही अडचणी आल्या आहेत, त्या दूर झाल्यावर मरिन शिबिरात दाखल होतील, असे सांगितले जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hockey competition india win