क्रीडा प्राधिकरणाकडून हॉकी इंडियाची कानउघाडणी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नवी दिल्ली/मुंबई - मार्गदर्शकांच्या संगीतखुर्चीवरून भारतीय क्रीडा प्राधिकरणाने हॉकी इंडियाची कानउघाडणी केल्याचे समजते. त्यानंतर नियुक्त झालेले मार्गदर्शक टोकियो ऑलिंपिकपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय हॉकी इंडियाने घेतल्याचे समजते. 

पुरुष हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंदर सिंग आणि महिला संघाचे पुन्हा मार्गदर्शक झालेले शूअर्ड मरिन यांना २०२० ऑलिंपिकपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय हॉकी इंडियाने घेतला आहे. मात्र हॉकी अभ्यासक यावर विश्‍वास ठेवण्यास तयार नाहीत. ऑल्टमन्स यांची नियुक्ती झाली, त्यावेळीही हॉकी इंडियाने ते टोकियो ऑलिंपिकपर्यंत मार्गदर्शक असतील, असे जाहीर केले होते, पण त्यापूर्वीच त्यांची उचलबांगडी झाली. आता अजूनही हरेंदर आणि मरिन यांच्याबाबत हाच निर्णय आशियाई स्पर्धा किंवा विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर होऊ शकेल, असे मानले जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hockey India