भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 जून 2016

लंडन - भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश मिळवून भारताने नवा इतिहास रचला आहे. 

लंडन - भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश मिळवून भारताने नवा इतिहास रचला आहे. 

अंतिम स्पर्धेतील प्रवेशासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा महत्त्वाचा सामना गुरुवारी झाला. अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे किंवा बरोबरीत सोडविणे आवश्‍यक होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 4-2 ने पराभूत केलं. या पराभवामुळे भारताला ब्रिटन-बेल्जियम सामन्याकडे डोळे लावून बसावे लागले. तो सामना बरोबरीत सुटल्याने भारत अंतिम सामन्यात पोचला आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत एकदाही अंतिम सामन्यात पोहोचलेला नाही. 1982 साली नेदरलॅंडमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने ब्रॉंझ पदक पटकावलं होतं. ही भारताची या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामिगरी होती.

आज रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hockey india's historic entry in final