मी फक्त जबाबदारी पार पाडतोय : रूपिंदर

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

कुआनतान (मलेशिया) : सध्या सुरू असलेल्या आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताचा रूपिंदरपाल सिंग भलताच फॉर्ममध्ये आहे; पण रूपिंदरला फॉर्म वगैरे काही मान्य नाही. "मी फक्त पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची माझी जबाबदारी पार पाडतोयं,' असे तो म्हणाला.

मलेशियात सुरू असलेल्या स्पर्धेत रूपिंदरने आतापर्यंत दहा गोल केले असून, ते सर्व कॉर्नरवर नोंदवले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने अशी कामगिरी प्रथमच केली आहे. त्याने सलामीला जपानविरुद्ध सहा, नंतर पाक, चीनविरुद्ध प्रत्येकी एक आणि मलेशियाविरुद्ध दोन गोल केले आहेत.

रूपिंदर प्रामुख्याने बचावफळीत खेळतो; पण आता त्याचा आत्मविश्‍वास आणखी दुणावला आहे. स्पर्धेत आणखी गोल करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे त्याने सांगितले. तो म्हणाला, ""निश्‍चितच मी या सर्व प्रवासाला स्वप्नवत असेच म्हणेन. महत्त्वाच्या वेळी आणि संघाला गरज असताना माझ्याकडून अशी कामगिरी होत आहे. अर्थात हे माझे कर्तव्यच आहे. मी मला दिलेली जबाबदारी चोख पार पाडण्याचा प्रयत्न करतोयं.''

रूपिंदरने सहा वर्षांपूर्वी मलेशियातच इपोह येथे सुल्तान अझलन शाह हॉकी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण केले. याच स्पर्धेत 2011 मध्ये त्याने ब्रिटनविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवली होती. रूपिंदर म्हणाला, ""माझ्या कारकिर्दीमधील त्या सर्व आठवणीत राहतील अशा घटना होत्या. त्यात आता या स्पर्धेतील कामगिरीची भर पडली.'' यंदाच्या मोसमात भारताकडून सर्वाधिक गोल रूपिंदरच्याच नावावर होते. स्पर्धेपूर्वी त्याने 20 सामन्यांत सात गोल केले होते. आता त्याची 24 सामन्यांत गोल संख्या सतरा अशी झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I know what's my duty and doing just that, says Rupinder Pal Singh