भारताचा सलग दुसरा विजय

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

ब्रेडा (नेदरलॅंड्‌स)- भारतीय पुरुष संघाने चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना रविवारी अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव केला. 

सामन्यात मिळालेल्या संधीचा फायदा उठवण्यात आलेले यश हेच भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. हरमनप्रीतने 17व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कराणी लावला, तर 28व्या मिनिटाला मनदीपने मैदानी गोल करत भारताची आघाडी वाढवली. त्यानंतर दोनच मिनिटांनी 30व्या मिनिटाला मॅटस पॅरेदेस याने कॉर्नरवर अर्जेंटिनाचा एकमात्र गोल नोंदवला. 

पहिल्या फेरीत पाकिस्तानवर मिळविलेला मोठा आणि आजच्या विजयानंतर भारत सहा संघांच्या स्पर्धेत गुणतक्‍त्यात आघाडीवर आहे. भारताचा पुढील सामना बुधवारी (ता. 27) ऑस्ट्रेलियाशी होईल. 

पाकिस्तानविरुद्ध विजय मिळविल्यानंतर भारतीय संघाने तोच जोश अर्जेंटिनाविरुद्ध कायम राखला. त्यांनी सर्वच आघाड्यांवर आपले पूर्ण वर्चस्व राखले. भारताचा बचाव राष्ट्रकुल स्पर्धेपासून चिंतेचा विषय बनला होता. मात्र, या वेळी भारतीय बचावफळीने अर्जेंटिनासमोर अभेद्य भिंत उभी केली होती. गुढघादुखीने रमणदीप खेळू शकला नाही, तरी त्याची उणीव अन्य खेळाडूंनी जाणवू दिली नाही. कारकिर्दीमधील तीनशेवा सामना खेळताना सरदार सिंगने मध्यरक्षकाची भूमिका चोख बजावली. आघाडीच्या फळीसाठी संधी निर्माण करण्यात त्याचा प्रमुख वाटा राहिला. 

अर्जेंटिनाची सुरवात वेगवान होती. त्यांनी पहिल्याच सत्रात तीन पेनल्टी कॉर्नर कमावून भारतीय बचाव फळीवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात ते पूर्ण अपयशी ठरले. ही सुरवात वगळता अर्जेंटिनाला पूर्ण सामन्यात काहीच साध्य करता आले नाही. भारतीय बचावफळीसमोर त्यांचे आक्रमक निष्प्रभ ठरले, तर भारतीय आक्रमकांसमोर त्यांच्या बचावफळीची कसोटी लागली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India stun Argentina to secure second successive win in tournament