अर्जेंटिनाकडून भारताची निसटती हार 

वृत्तसंस्था
रविवार, 4 मार्च 2018

इपोह (मलेशिया) : अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत भारताला अर्जेंटिनाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात 2-3 अशा निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले. अर्जेंटिना हा जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. त्यांच्या गोन्झालो पेलटने हॅट्ट्रिक केले; तर भारताचे गोल अमित रोहिदासने झळकावले. या सामन्याला वादळी पावसाचा फटका बसला. 

सामन्यातील पाचही गोल पेनल्टी कॉर्नरवर झाले. अर्जेंटिनाला सात पेनल्टी कॉर्नर मिळाले, तर भारतासाठी चार पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली होती. पहिल्या सत्राच्या अखेरीला पटेलने गोल करून अर्जेंटिनाचे खाते उघडले आणि 24 व्या मिनिटाला ही आघाडी दुप्पट केली. 

दोन मिनिटांनंतर रोहिदासनेही पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि मध्यंतराला गुणफलक 1-2 असा केला. रोहिदासची ही चमक एवढ्यावर मर्यादित राहिली नाही. 31 व्या मिनिटाला त्याने आणखी एक गोल केला. 2-2 अशा बरोबरीमुळे भारतीयांचा आत्मविश्‍वास वाढला होता; पण तो क्षणभंगूरच ठरला. दोनच मिनिटानंतर पटेलने हॅट्ट्रिक पूर्ण केली. 

सामन्याची चुरस वाढलेली असताना भारतीय तोडीस तोड उत्तर देत होते. अंतिम सत्राचा खेळ सुरू होताच वादळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे 45 मिनिटे खेळ थांबवावा लागला. परिणामी लय बिघडल्यामुळे भारताला बरोबरीचा गोल करता आला नाही. सुमितला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्यामुळे अखेरच्या पाच मिनिटांत भारताला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. 

आज इंग्लंडचे आव्हान 
भारताचा पुढील सामना रविवारी इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि मलेशिया यांचेही संघ सहभागी झाले आहेत. भारताने अक्षरदीप सिंग, एस. व्ही. सुनील, मनदीप सिंग, मनप्रीत सिंग आणि गोलरक्षक श्रीजेश यांच्या अनुपस्थितीत नवोदित खेळाडूंना स्थान दिले आहेत. तसेच अनुभवी ड्रॅग फ्लिकर रूपिंदरपाल सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनाही विश्रांती दिली आहे. 

दृष्टिक्षेपात 

  • जागतिक क्रमवारीत अर्जेंटिना दुसरे, भारत सहावा 
  • सामन्यातील सातही गोल पेनल्टी कॉर्नरवर 
  • वादळी पावसामुळे पाऊण तास खेळ थांबवला
Web Title: marathi news azlan shah cup 2018 India Hockey