ऑलिंपिकसाठी गोलरक्षक श्रीजेश भारताचा कर्णधार

वृत्तसंस्था
Tuesday, 12 July 2016

नवी दिल्ली : पुढील महिन्यात ब्राझीलमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाची धुरा अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशकडे सोपविण्याची घोषणा आज (मंगळवार) करण्यात आली. माजी कर्णधार सरदार सिंगची निवड झाली असली, तरीही त्याला कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे. 

गेल्या महिन्यात चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने उपविजेतेपद पटकाविले होते. या संघातील बचावपटू वीरेंद्र लाक्रा, जसजितसिंग कुलर आणि धरमवीर सिंग यांना ऑलिंपिकसाठी संघात स्थान मिळालेले नाही. गेल्या काही महिन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या हरमनप्रित सिम्ग आणि सुरेंदर कुमार या तरुण खेळाडूंना ऑलिंपिकसाठी निवड समितीने संधी दिली आहे. 

या संघामध्ये श्रीजेश हाच एकमेव गोलरक्षक असेल. मात्र ऑलिंपिक स्पर्धेच्या नियमांनुसार, संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंची जागा घेण्यासाठी दोन अतिरिक्त राखीव खेळाडूंचा समावेश करण्याची मुभा देण्यात आली आहे. 

रिओ ऑलिंपिकसाठी भारतीय हॉकी संघ : 
पी. आर. श्रीजेश (गोलरक्षक, कर्णधार), हरमनप्रित सिंग, रुपिंदरपाल सिंग, कोथलजित सिंग, सुरेंदर कुमार, मनप्रित, सरदार सिंग, व्ही. आर. रघुनाथ, एस. के. उथप्पा, दानिश मुज्ताबा, देवेंद्र वाल्मिकी, एस. व्ही. सुनील, आकाशदीप सिंग, चिंगलेन्सन सिंग, रमणदीप सिंग, एन. थिमय्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PR Sreejesh to lead India in Hockey for Rio Olympics