सरदार, वीरेंद्र लाक्राचे पुनरागमन

पीटीआय
शुक्रवार, 1 जून 2018

नवी दिल्ली - माजी कर्णधार आणि मध्यरक्षक सरदार सिंग, तसेच बचावपटू वीरेंद्र लाक्रा यांना चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे. ही स्पर्धा नेदरलॅंड्‌समध्ये २३ जूनपासून सुरू होईल. 

गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याच्या नेतृत्त्वाखालील १८ सदस्यीय संघ जाहीर करताना हॉकी इंडियाने संघात मोठे बदल केले आहेत. 

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सरदारला वगळण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय शिबिरासाठी त्याला पाचारण करण्यात आल्यावर त्याचा संघातील समावेश निश्‍चित मानला जात होता. त्याच्याप्रमाणेच संघातून वगळलेल्या वीरेंद्र लाक्राला देखील पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे. 

या संघातून बचावपटू रूपिंदरपाल सिंग, कोथाजित सिंग, गुरिंदर सिंग यांना वगळण्यात आले असून, जर्मनप्रीत सिंग आणि सुरेंद्र लाक्रा यांचा समावेश करण्यात आला आहे. स्ट्रायकर म्हणून रमणदीपला परत बोलावताना ललित उपाध्याय आणि गुरजंत सिंग यांना वगळण्यात आले आहे. 

श्रीजेशच्या साथीला क्रिशन पाठक याची निवड करण्यात आली आहे. सूरज करकेरा याला वगळण्यात आले. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी २३ जून रोजी होईल. 

संघ - गोलरक्षक - पी. आर. श्रीजेश, क्रिशन पाठक, बचावपटू - हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, सुरेंद्र  कुमार, जर्मनप्रीत सिंग, वीरेंद्र लाक्रा, अमित रोहिदास, मध्यरक्षक - मनप्रीत सिंग, चिंग्लेनसना सिंग (उपकर्णधार), सरदार सिंग, विवेक प्रसाद, आक्रमक - एस. व्ही. सुनील, रमणदीप सिंग, मनदीप सिंग, सुमीत कुमार (ज्युनि.), आकाशदीप सिंग, दिलप्रीत सिंग.

आशियाई स्पर्धेसाठी संघात स्थान टिकवायचे असेल तर खेळाडूंना या स्पर्धेत आपली सर्वोत्तम आणि सातत्यपूर्ण कामगिरी दाखवावी लागेल.
- हरेंदर सिंग, भारताचे प्रशिक्षक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sardar singh virendra lakra hocky team