सदोष बचावात्मक खेळाचा भारतास फटका

पीटीआय
बुधवार, 12 जुलै 2017

मुंबई / जोहान्सबर्ग - सदोष बचावात्मक खेळ; तसेच ड्रॅगफ्लिकरच्या अभावामुळे भारतीय महिला संघ वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यातील अमेरिकेविरुद्धच्या गटसाखळी लढतीत हार पत्करावी लागली. अत्यंत वेगवान खेळ करणाऱ्या अमेरिकेने अखेरच्या ११ मिनिटांत तीन गोल करीत भारतास १-४ अशी हार पत्करण्यास भाग पाडले.

सलामीच्या सामन्यातील बरोबरीमुळे; तसेच जागतिक हॉकीतील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर क्षमता सिद्ध करण्याचे दडपण महिला संघावर होते. त्यामुळेच सुरवात करताना चेंडू बॅकपास करण्याऐवजी स्कूप केला गेला. तो मैदानाबाहेर गेला नसता तरच नवल होते. काही सेकंदात अमेरिकेला फ्री हिट बहाल करण्यात आली. तिसऱ्या सत्रात लिलीमा मिंझने साधलेल्या बरोबरीच्या गोलपासून प्रेरणा घेण्याऐवजी भारतीयांचा खेळ जास्तच विस्कळित झाला आणि पराभव पदरी आला.

भारत हा कडवा प्रतिस्पर्धी आहे. भारताविरुद्धच्या लढतीत कोणत्याही क्षणी गाफील राहून चालत नाही. सुरवातीपासून अखेरपर्यंत संपूर्ण कस पाहणारी ही लढत असते. आम्ही योजनेची पूर्ण अंमलबजावणी केली; तसेच आमच्या क्षमतेनुसार खेळ केल्यामुळेच जिंकलो.
- मेलिसा गोंझालेझ, अमेरिकेची कर्णधार

निकाल
भारत - १ (लिलीमा मिंझ ३८वे मिनीट) पराभूत विरुद्ध अमेरिका - ४ (जिल वीट्‌मर २४, ४३, टेलर वेस्ट ४०, मिशेल व्हिटेसी ४९)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news hockey