हॉकी विजेतेपदापासून भारतीय संघ दूरच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

मुंबई - भारतीय आक्रमकांनी बेल्जियमचा बचाव भेदला; पण ऑलिंपिक उपविजेत्यांनी न कोलमडता जोरदार प्रतिकार केला. बेल्जियमने अखेर पेनल्टी शूटआउटवर बाजी मारत चौरंगी हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातही भारतास विजेतेपदापासून वंचित ठेवले.

हॅमिल्टनला झालेल्या निर्णायक लढतीत निर्धारित वेळेत भारताने चारही वेळा आघाडी दवडत ४-४ बरोबरी स्वीकारली. यातील अखेरचा गोल तर चार मिनिटे असताना स्वीकारला. पेनल्टी शूटआऊटमध्ये हरमनप्रीत सिंग, ललित उपाध्याय, रूपिंदरपाल सिंग यांना गोल करता आले नाहीत, त्यामुळे भारतास हार पत्करावी लागली. 

अंतिम लढतीत उच्च दर्जाच्या खेळाची मेजवानी लाभली. दोन्ही संघ छान बहरात होते. रमणदीप सिंग (२९, ५३), नीलकांता शर्मा (४२) आणि मनदीप सिंग (४९) यांच्या गोलने निर्धारित वेळेत भारताच्या आशा कायम राखल्या होत्या, तर तॅनगुय कॉसिन्स (४१), सेड्रीक चार्लिएर (४३), अमौरी केउस्टर्स (५१) आणि फेलिक्‍स डेनॅयेर (५६) यांनी भारतास वर्चस्वापासून वंचित ठेवले. 

बेल्जियमच्या वेगवान आक्रमक सुरवातीस श्रीजेशने पहिल्या सत्रात रोखले. या कालावधीत त्याने दोन पेनल्टी कॉर्नर आणि एक पेनल्टी किक रोखली. दुसऱ्या सत्राच्या सुरवातीस भारताने दोन पेनल्टी कॉर्नर दवडले; पण या सत्रात केलेल्या गोलच्या जोरावरच भारताने विश्रांतीस आघाडी घेतली. तिसऱ्या सत्रात तीन गोल झाले, तर चौथ्या सत्रात चार. या सत्रातच अमौरी केऊस्टर्स याला श्रीजेशच्या चुकीमुळे गोल करता आला. या वेळी अतिउत्साहामुळे तो पुढे सरसावला. त्याचा फटका भारतास बसला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news hockey competition