सरदारचे पुनरागमन; पण भवितव्य अनिश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

मुंबई - पुनरागमनाची संधी देत सरदार सिंगला सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेसाठी थेट कर्णधार करण्यात आले आहे. अर्थात, त्यानंतरही महत्त्वाच्या स्पर्धेच्या वेळी त्याला स्थान मिळण्याची शक्‍यता धूसरच असल्याचे संकेत मिळत आहेत. 

जागतिक हॉकी लीगचा अंतिम टप्पा; तसेच न्यूझीलंड दौऱ्याच्या वेळी सरदारला ब्रेक देण्यात आला होता. आता या दोन्ही स्पर्धांच्या वेळी कर्णधार असलेल्या मनप्रीत सिंगला ब्रेक दिला गेला. अझलन स्पर्धेसाठी ही निवड झाली असली, तरी त्याची राष्ट्रकुल, विश्‍वकरंडक; तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड होण्याची शक्‍यता कमी आहे. 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा; तसेच सुलतान अझलन शाह स्पर्धेसाठी जवळपास भिन्न संघ निवडण्याचा निर्णय निवड समितीने घेतला होता. त्यांनी याबाबत मार्गदर्शक शूअर्ड मरीन; तसेच हॉकी इंडियाचे हाय परफॉर्मन्स डायरेक्‍टर डेव्हीड जॉन यांचा सल्ला घेतला होता. 

दोन वर्षांनी होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये खेळू शकणारे खेळाडूच वर्षातील तीन महत्त्वाच्या स्पर्धांसाठी निवडण्याचे ठरले आहे. अर्थातच या स्पर्धांसाठी दोन वर्षांपूर्वी विश्‍वकरंडक कुमार हॉकी स्पर्धा जिंकलेल्या संघातील खेळाडू प्रामुख्याने असतील.

निवडलेल्या संघात तीन नवोदित आहेत. त्यांच्यासह प्रत्येक जण प्रत्येक स्पर्धेसाठी संघनिवडीच्या स्पर्धेत राहिल. आपली उपयुक्तता प्रत्येकास सिद्ध करावी लागेल, असे हाय परफॉर्मन्स डायरेक्‍टर डेव्हीड जॉन यांनी सांगितले; तर निवड समितीचे प्रमुख हरविंदर सिंग यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेद्वारे थेट ऑलिंपिक प्रवेशाचे लक्ष्य असल्याचे सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news hockey competition sardar singh