अर्जेंटिनाकडून भारतीय संघ पराभूत

वृत्तसंस्था
रविवार, 4 मार्च 2018

इपोह (मलेशिया) - अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत भारताला अर्जेंटिनाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात २-३ अशा निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले. अर्जेंटिना हा जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. त्यांच्या गोंझालो पेलटने हॅटट्रिक केले; तर भारताचे गोल अमित रोहिदासने झळकावले. या सामन्याला वादळी पावसाचा फटका बसला.

सामन्यातील पाचही गोल पेनल्टी कॉर्नरवर झाले. अर्जेंटिनाला सात पेनल्टी कॉर्नर मिळाले, तर भारतासाठी चार पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली होती. पहिल्या सत्राच्या अखेरीला पेलटने गोल करून अर्जेंटिनाचे खाते उघडले आणि २४ व्या मिनिटाला ही आघाडी दुप्पट केली.

दोन मिनिटांनंतर रोहिदासनेही पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि मध्यंतराला गुणफलक १-२ असा केला. रोहिदासची ही चमक एवढ्यावर मर्यादित राहिली नाही. ३१ व्या मिनिटाला त्याने आणखी एक गोल केला. २-२ अशा बरोबरीमुळे भारतीयांचा आत्मविश्‍वास वाढला होता; पण तो क्षणभंगूरच ठरला. दोनच मिनिटानंतर पेलटने हॅट्ट्रिक पूर्ण केली. सामन्याची चुरस वाढलेली असताना भारतीय तोडीस तोड उत्तर देत होते. अंतिम सत्राचा खेळ सुरू होताच वादळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे ४५ मिनिटे खेळ थांबवावा लागला. परिणामी लय बिघडल्यामुळे भारताला बरोबरीचा गोल करता आला नाही. सुमितला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्यामुळे अखेरच्या पाच मिनिटांत भारताला दहा खेळाडूंसह खेळावे लागले.

आज इंग्लंडचे आव्हान 
भारताचा पुढील सामना रविवारी इंग्लंडविरुद्ध होणार आहे. 

दृष्टिक्षेपात
 जागतिक क्रमवारीत अर्जेंटिना दुसरे, भारत सहावा
 सामन्यातील सातही गोल पेनल्टी कॉर्नरवर
 वादळी पावसामुळे पाऊण तास खेळ थांबवला

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news hockey india Argentina