हॉकी लीगला एका वर्षाचा ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई - हॉकी इंडियाने हॉकी इंडिया लीगला पुढील वर्षी ब्रेक देण्याचे ठरवले आहे. नव्या वर्षाच्या सुरवातीस होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि हॉकी इंडिया लीगचा संघर्ष टाळण्यासाठी हा निर्णय झाला आहे. हॉकी इंडिया लीग २०१९ पासून नव्या स्वरूपात येईल, अशी ग्वाही देण्यात आली.

हॉकी इंडियाच्या पाच वर्षांच्या यशस्वी संयोजनानंतर या लीगचा आढावा घेण्यात आला. या संदर्भात फ्रॅंचाईजी, तसेच संबंधितांबरोबर चर्चा करण्यात आली. त्यानंतरच ही लीग एक वर्ष न घेण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे हॉकी इंडिया लीगचे कार्याध्यक्ष महंमद मुश्‍ताक अहमद यांनी सांगितले. नव्या वर्षाच्या सुरवातीस असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सहभागावर परिणाम होईल, असे अहमद यांनी सांगितले. 

नव्या वर्षात फेब्रुवारीत जागतिक इनडोअर हॉकी स्पर्धा आहे. त्याचबरोबर एप्रिलमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहे. ऑगस्टमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा आहे; तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विश्‍वकरंडक स्पर्धा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news hockey league 1 year break