मलेशियाच्या गोलनंतर चिंता वाढली होती

पीटीआय
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मुंबई - मलेशियाच्या गोलनंतर खूप चिंता वाढली होती. काय होणार? याची काळजी वाटत होती. या अखेरच्या १० मिनिटांत केलेला बचाव सुखावणारा होता, असे भारतीय हॉकी मार्गदर्शक जोएर्ड मरिन यांनी सांगितले.

मुंबई - मलेशियाच्या गोलनंतर खूप चिंता वाढली होती. काय होणार? याची काळजी वाटत होती. या अखेरच्या १० मिनिटांत केलेला बचाव सुखावणारा होता, असे भारतीय हॉकी मार्गदर्शक जोएर्ड मरिन यांनी सांगितले.

भारताने मलेशियाविरुद्धच्या आशिया हॉकी लढतीच्या अंतिम लढतीत चांगली सुरवात केली होती; पण भारताला अखेर निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले. याकडे लक्ष वेधल्यावर मरिन म्हणाले, मलेशियाने गोल केल्यावर माझी चिंता वाढली होती. या संघासोबतची माझी ही पहिलीच स्पर्धा आहे. त्यामुळे हे काहीसे स्वाभाविकच होते. त्यातच काहीही अपेक्षित नसताना अखेरच्या काही मिनिटांत गोल झाल्याचे हॉकीने अनेकदा अनुभवले आहे. भारतीय खेळाडू या परिस्थितीस कसे सामोरे जातात, याचा अनुभव मला आला. या कालावधीत त्यांनी केलेला बचाव मला नक्कीच समाधान देणारा होता, असे त्यांनी सांगितले. 

भारताने या स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये मलेशियाचा ६-३ असा पाडाव केला होता; पण अंतिम फेरीत जेमतेम विजय लाभला. 

यासंदर्भात मार्गदर्शक म्हणाले, मध्यांतरापर्यंत चांगला खेळ झाला होता; पण त्यानंतर आपला जोश काहीसा कमी झाला. आपल्या खेळातील एनर्जी काहीशी कमी झाली. आपल्याला तिसऱ्या गोलच्या अनेक संधी आल्या होत्या. त्या आपण साधल्या नाहीत. त्यांना आपण प्रतिकाराची संधी दिली. त्यांनी गोल करण्याची निर्माण केलेली एकमेव संधी साधली. त्यामुळे आपण दडपणाखाली आलो.

या स्पर्धेत आम्ही सर्व सामने जिंकण्याचे लक्ष्य बाळगले होते. त्यात बऱ्यापैकी यश आले. ही स्पर्धा जिंकण्याचे लक्ष्य साध्य केले. सरस मानांकनानुसार कामगिरी केली. हे नक्कीच महत्त्वाचे आहे. आम्हाला हे विजेतेपद नक्कीच आनंद देत आहे. 
- मनप्रीत सिंग,  भारतीय कर्णधार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news hockey Malaysia