राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी ऐश्‍वर्या राज्याची कर्णधार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

पुणे - वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या ऐश्‍वर्या चव्हाण हिची महाराष्ट्र हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. पुण्याची गोलरक्षक चैताली दुबेरकर उपकर्णधार असेल. महाराष्ट्राचा पहिला सामना गुरुवारी (ता. १) झारखंडविरुद्ध होईल. महाराष्ट्राचा ‘ड’ गटात समावेश असून, ऑल इंडिया युनिर्व्हसिटी, झारखंड, उत्तर प्रदेश आणि कूर्ग हे गटातील अन्य संघ आहेत. 

महाराष्ट्र संघ - ऐश्‍वर्या चव्हाण (कर्णधार), चैताली दुबेरकर (गोलरक्षक, उपकर्णधार), ऐश्‍वर्या शेंडे (गोलरक्षक), कविता विद्यार्थी, भावना खाडे, श्रद्धा तिवारी, प्रज्ञा भोसले, प्रगती बाणेवर, स्नेहल वाकसे, प्रियंका वडमारे, पूजा शेंडे, अंकिता साप्ते, रूपाली सावंत, शिवानी बावडेकर, के. एम. रिता, वैष्णवी फाळके, ऋतुजा पिसाळ.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news hockey news aishwarya chavan captain