esakal | नवोदित हॉकीपटूंसाठी ना ब्लॅंकेट, ना गरम पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

नवोदित हॉकीपटूंसाठी ना ब्लॅंकेट, ना गरम पाणी

नवोदित हॉकीपटूंसाठी ना ब्लॅंकेट, ना गरम पाणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - देशभरात थंडीचा कडाका वाढत आहे. याचवेळी इम्फाळला होत असलेल्या राष्ट्रीय किशोर हॉकी स्पर्धेतील खेळाडूंना ब्लॅंकेट दिले जात नाही किंवा गरम पाणीही मिळत नाही. हे कमीच की काय म्हणून बाथरूम तुंबत आहेत. 

हॉकी इंडियाची आर्थिक स्थिती भक्कम असतानाही हे  धक्कादायक आहे. खेळाडूंना बेडही दिलेले नाहीत. त्यामुळे जमिनीवर टाकण्यात आलेल्या मॅट्रेसवर झोपणे भाग पडत आहे. त्यातच ब्लॅंकेट्‌स नसल्याने थंडीचा कडाका जाणवत आहे. ‘ब्लॅंकेट नाहीत, गरम पाणी नाही. वॉशरूम चांगल्या नाहीत, या परिस्थितीत खेळाडू आजारीच पडणार. यापूर्वी कधीही इतकी वाईट परिस्थिती नव्हती,’ असे कर्नाटकचा खेळाडू करिअप्पाने सांगितल्याचे वृत्त आहे. 

सुरवातीस खेळाडूंची निवासव्यवस्था चुकीच्या ठिकाणी झाली; पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यांच्यासाठी राखीव रूममध्येच त्यांना हलवण्यात आले आहे, असे मणिपूरचे क्रीडा संचालक प्रवीणसिंग यांनी सांगितले.

loading image