श्रीजेशचे भारतीय संघात पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

मुंबई - माजी कर्णधार पीआर श्रीजेशने भारतीय हॉकी संघात पुनरागमन केले आहे. न्यूझीलंडमधील चौरंगी हॉकी स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात श्रीजेशची निवड करताना आकाश चिकटे, तसेच सूरज करकेरा या आशियाई, तसेच हॉकी लीगमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या गोलरक्षकांना ब्रेक देण्यात आला आहे. 

मुंबई - माजी कर्णधार पीआर श्रीजेशने भारतीय हॉकी संघात पुनरागमन केले आहे. न्यूझीलंडमधील चौरंगी हॉकी स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात श्रीजेशची निवड करताना आकाश चिकटे, तसेच सूरज करकेरा या आशियाई, तसेच हॉकी लीगमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या गोलरक्षकांना ब्रेक देण्यात आला आहे. 

गतवर्षी अझलान शाह स्पर्धेत खेळताना श्रीजेशला दुखापत झाली होती. तो आठ महिन्यांनंतर संघात येत आहे. मनप्रीत सिंगच कर्णधार असलेल्या या संघात श्रीजेशप्रमाणे विश्‍वकरंडक कुमारविजेत्या संघातील गोलरक्षक कृष्णन बहादूर पाठक याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र आकाश चिकटे आणि सूरज करकेरा या गोलरक्षकांना संघाबाहेर ठेवण्याचे कारण हॉकी इंडियाने स्पष्ट केलेले नाही. 

हॉकी लीगच्या अंतिम टप्प्याच्या वेळी संघाबाहेर असलेला सरदार सिंग याच्याबरोबरच एस. व्ही. सुनील या अनुभवी खेळाडूसही बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी आक्रमक दिलप्रीत सिंग, मध्यरक्षक विवेक सागर प्रसाद या नवोदितांची निवड झाली आहे. ‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी या स्पर्धेचा फायदा होईल, नवोदित तसेच काही अनुभवी खेळाडूंचा या संघात चांगला संगम आहे,’ असे मार्गदर्शक श्रुअर्ड मरिन यांनी सांगितले. 

संघ - गोलरक्षक - पीआर श्रीजेश, कृष्णन बहादूर पाठक. बचावपटू - हरमनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, गुरिंदर सिंग, वरुण कुमार, रुपिंदरपाल सिंग, बिरेंदर लाक्रा. मध्यरक्षक - मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंगलेनसाना सिंग, विवेक सागर प्रसाद, हरजीत सिंग, नीलकांत शर्मा, सिमरनजीत सिंग, सतबीर सिंग. आक्रमक - दिलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अरमान कुरेशी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news pr sreejesh comeback in indian hockey team