वर्ल्डकप पात्रतेची थेट संधी हुकली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

निर्णायक लढतीत भारतीय महिलांचा जपानकडून पराभव
जोहन्सबर्ग - भारतीय महिला हॉकी संघाने विश्‍वकरंडक पात्रतेची थेट संधी असताना वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यातील जपानविरुद्धच्या लढतीत ०-२ पराभव ओढवून घेतला. या पराभवामुळे भारताचे जागतिक मानांकनही आता घसरणार आहे.

निर्णायक लढतीत भारतीय महिलांचा जपानकडून पराभव
जोहन्सबर्ग - भारतीय महिला हॉकी संघाने विश्‍वकरंडक पात्रतेची थेट संधी असताना वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यातील जपानविरुद्धच्या लढतीत ०-२ पराभव ओढवून घेतला. या पराभवामुळे भारताचे जागतिक मानांकनही आता घसरणार आहे.

जागतिक क्रमवारीत भारत बाराव्या, तर जपान सोळाव्या क्रमांकावर आहे. जागतिक क्रमवारीनुसार या स्पर्धेत भारत अव्वल सहा संघांत येणे अपेक्षित होते. ते घडणार नाही, तसेच दुबळ्या संघाविरुद्धच्या पराभवाचा फटकाही भारतास बसेल. आता विश्‍वकरंडक पात्रतेची थेट संधी हुकली आहे, पण सर्वच काही संपलेले नाही. आशिया कप विजेतेपद अथवा या स्पर्धेतील अव्वल सहा संघांनी अन्य मार्गाने पात्रता मिळवल्यास भारतास प्रवेश मिळू शकेल. सदोष बचावात्मक खेळाचा भारतास फटका बसला. 

जपानी आक्रमणे रोखण्याची भारतात क्षमताच नव्हती. जपानने इंग्लंडला हरवले आहे. इंग्लंडने आपल्याला ४-१ हरवले आहे. यामुळे भारतीय सुरवातीस दबावाने खेळत होते. हे पाहून जपानने सुरवातीपासून आक्रमण केले. सातव्या मिनिटास काना नोमुरा आणि २९ व्या मिनिटास नाहो इचितानी हिने गोल करीत जपानचा विजय निश्‍चित केला. 

तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात भारताचा खेळ सुधारला. सवितास बचावपटूंची साथ लाभली. त्यामुळे गोल झाले नाहीत, पण त्याचवेळी प्रतिआक्रमण करणाऱ्या भारतीयांत योजनेचा अभाव होता. नेमबाजीही सदोष होती. राणी रामपाल, वंदना कटियारचे प्रयत्न कमी पडत होते. चौथ्या सत्रात रेणुका यादवने चेंडू गोलजाळ्यात धाडला; पण हा गोल नसल्याचा निर्णय जपानने व्हिडिओ पंचांकडून मिळवला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news world hockey league competition