महिला हॉकीत ऑस्ट्रेलियावर मात

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

मेलबर्न - एकाचवेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाची सुरवात विरोधी झाली. पुरुष संघाला चौरंगी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-३ असा पराभव पत्करावा लागला. महिला संघाने मात्र तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर १-० असा विजय मिळविला.

 महिला क्रमवारीत १२व्या स्थानाव असणाऱ्या भारताने  विजय मिळवून सर्वांनाच चकित केले. कर्णधार राणी रामपाल हिने पूर्वार्धातील दुसऱ्या सत्रात गोल केला.  

पुरुष संघ पराभूत
पुरुष संघ मात्र विजयापासून दूर राहिला. २१व्या मिनिटास रुपिंदरने कॉर्नर सत्कारणी लावतना भारताला आघाडीवर नेले. मात्र, तीनच मिनिटाने जेर्मी हेवर्डने कॉर्नरवच गोल नोंदवून ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली. ३६व्या मिनिटाला आणखी एक कॉर्नर सत्कराणी लावत त्याने ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. पाटोपाट ट्रेंट मिट्टॉन याने गोल केला. ५३व्या मिनिटाला रुपिंदरनेच गोल नोंदविला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women's hockey win over Australia