पॅरिसमध्ये सुरू असलेल्या एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या अँडी मरे याने अंतिम फेरी गाठली, तर नोव्हाक जोकोविच उपांत्यपूर्व फेरीतच हरला. त्यामुळे अँडी मरेचा अव्वल क्रमांकापर्यंतचा प्रवास सुकर झाला. अर्थात मरे या किताबासाठी सर्वार्थाने पात्र आहे. गेल्या १२ महिन्यांच्या कालाधीत त्याने कमालीचे सातत्य राखले. आई ज्यूडी यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिसचा श्रीगणेशा गिरविलेल्या मरेची कामगिरी टेनिसजगतात कौतुकाचा विषय ठरली आहे.

विजेतेपदासह अव्वल क्रमांकाचा जल्लोष
मरेने पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या जॉन इस्नरला ६-३, ६-७ (४-७), ६-४ असे हरवून अव्वल क्रमांकाचा विजेतपदासह जल्लोष केला.
प्रारंभी ग्रॅंड स्लॅम विजेतेपद जिंकावे, असे मला नेहमीच वाटायचे. आता माझे वय वाढले आहे. त्यामुळे मी अव्वल क्रमांकासाठी सुद्धा प्रयत्न केला. गेल्या दोन मोसमांत मी सातत्य उंचावले. त्यामुळे मला या कामगिरीचा फार आनंद आणि अभिमानसुद्धा वाटतो.
- अँडी मरे
अँडी तुझे अभिनंदन, आपल्या खेळात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या टेनिसपटूंच्या छोट्याशा क्लबमध्ये तुझे स्वागत असो.
- बोरिस बेकर,
आपल्या टेनिसनगरीत नव्या राजाचा उदय झाला आहे. सर अँडी मरे, आपले अभिनंदन.
- रॉजर फेडरर
अँडी मरेसाठी अत्यंत सार्थ अशी कामगिरी. तो अव्वल क्रमांकापर्यंत गेला याचा आनंद वाटतो. दीर्घ काळापासून याची प्रतीक्षा होती.
- अँडी रॉडिक,
यापूर्वीचे नंबर वन टेनिसपटू
(कालावधीनुसार उतरत्या क्रमाने) - नोव्हाक जोकोविच, रॅफेल नदाल, रॉजर फेडरर, अँडी रॉडीक, जुआन कार्लोस फेरेरो, लेटन ह्युईट, गस्ताव कर्टन, मॅराट साफीन, पॅट्रिक राफ्टर, येवगेनी कॅफेल्निकोव, कार्लोस मोया, मार्सेलो रिऑस, थॉमस मस्टर, आंद्रे अगासी, पीट सॅंप्रास, जिम कुरियर, बोरिस बेकर, स्टीफन एडबर्ग, मॅट्स विलॅंडर, इव्हान लेंडल, जॉन मॅकेन्रो, बियाँ बोर्ग, जिमी कॉनर्स, जॉन न्यूकोम्ब, इली नस्तासे.